ठाण्यातील गावदेवी मैदानात रंगणार ‘नादोत्सवम 2026’चा भक्ती-संगीताचा उत्सव!

संगीताचा संगम साधणाऱ्या या महोत्सवात पद्मश्री पुरस्काराने सन्मानित भिकल्या लाडक्या धिंडा यांचे तारपा वादन हे प्रमुख आकर्षण असणार आहे.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 10 22T172735.495

‘Nadotsavam 2026’ – A Festival of Devotional Music! : महाराष्ट्राच्या लोककला आणि भक्ती-संगीताचा अनुभव घेण्याची संधी ठाणेकरांना आता लवकरच मिळणार आहे. झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम 2026’ या सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात 31 ऑक्टोबर रोजी ठाण्यातील गावदेवी मैदानात होणार असून पारंपरिक लोककला आणि आजच्या संगीताचा संगम साधणाऱ्या या महोत्सवात पद्मश्री पुरस्काराने सन्मानित भिकल्या लाडक्या धिंडा यांचे तारपा वादन हे प्रमुख आकर्षण असणार आहे. त्याचबरोबर ‘अभंग रिपोस्ट’ बँडच्या खास सादरीकरणातून भक्ती-संगीताचा आधुनिक अंदाज अनुभवायला मिळणार आहे.

महाराष्ट्राच्या आदिवासी लोकसंस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या तारपा वादनाला या महोत्सवाच्या माध्यमातून विशेष स्थान मिळणार आहे. पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा यांच्या सादरीकरणातून ठाणेकरांना या पारंपरिक कलेचा अनुभव घेता येईल. स्थानिक लोककला आणि कलाकारांना मोठ्या मंचावर आणण्याच्या ‘नादोत्सवम’च्या प्रयत्नामुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.

या कार्यक्रमातील आणखी एक खास आकर्षण म्हणजे ‘अभंग रिपोस्ट’ बँड. महाराष्ट्राच्या भक्तीपरंपरेतील लोकप्रिय अभंगांना आधुनिक संगीताची जोड देत हा बँड आपली खास शैली सादर करणार आहे. पारंपरिक अभंगांचा भाव कायम ठेवत त्यांना आजच्या पिढीच्या संगीताच्या आवडीनुसार सादर करण्याचा हा प्रयत्न प्रेक्षकांसाठी एक वेगळा संगीतानुभव ठरणार आहे. झी मराठीवरील लोकप्रिय कलाकार प्रसाद जवादे आणि शिवानी सोनार या महोत्सवाचे सूत्रसंचालन करणार असून पारंपरिक लोककला, भक्ती-संगीत आणि आधुनिक सादरीकरणांचा मेळ साधणारा हा कार्यक्रम ठाणेकरांसाठी सांस्कृतिक पर्वणी ठरणार आहे.

काय राव, जरांगेंनी काय माल पटवलाय, माझ्याकडेही एक क्लिप आहे, अजय बारस्करांचा जरांगेंवर पलटवार

झी मराठी, झी टॉकीज व मराठी झी५च्या बिझनेस हेड आणि चीफ चॅनेल ऑफिसर हेमा व्ही. आर. म्हणाल्या, “स्थानिक कलाकारांची कला त्यांच्या भागातील संस्कृतीची ओळख करून देत असते. ठाण्यातील गावदेवी मैदानावर होणाऱ्या ‘नादोत्सवम’च्या कार्यक्रमातून पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा यांच्या तारपा वादनाचा अनुभव प्रेक्षकांना घेता येणार आहे. अशा कलाकारांच्या कलेला मोठ्या मंचावर सादर करण्याची संधी मिळणं महत्त्वाचं आहे. आपल्या लोकपरंपरेतील या कलांचा अनुभव अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा आणि त्यांची ओळख नव्या पिढीलाही व्हावी, हा या कार्यक्रमामागचा आमचा उद्देश आहे.”

यूथ बिझनेस हेड अलंकार पाठारे म्हणाले, “‘अभंग रिपोस्ट’च्या माध्यमातून अभंगांना आजच्या संगीताची जोड देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि या नादोत्सवमच्या प्रवासात मोलाची साथ आणि सहकार्य दिल्याबद्दल अस्तित्व थिएटरचे आभार! आजच्या तरुणांना संगीताच्या वेगवेगळ्या शैली अनुभवायला आवडतात. त्यांच्यापर्यंत अभंग पोहोचवताना त्यातील भाव आणि अर्थ कायम ठेवून त्यांची आधुनिक मांडणी करता येते, हे ‘अभंग रिपोस्ट’मधून अनुभवायला मिळेल. ‘नादोत्सवम’सारख्या मंचावर पारंपरिक भक्ती-संगीत आणि आजच्या संगीतशैली एकत्र येणं, ही कलाकारांसाठी आणि प्रेक्षकांसाठीही एक वेगळी संधी आहे.’’

31 ऑक्टोबर रोजी ठाण्यातील गावदेवी मैदानापासून सुरू होणारा ‘नादोत्सवम 2026’ हा महाराष्ट्राच्या लोककला आणि भक्ती-संगीताचा उत्सव स्थानिक कलाकारांना व्यासपीठ देतानाच पारंपरिक कलेचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे.

follow us