निलेश लंके नेमक्या कोणत्या गटात? पवारांच्या डोक्यात प्लॅन काय?

निलेश लंके नेमक्या कोणत्या गटात? पवारांच्या डोक्यात प्लॅन काय?

अहमदनगर – लोकसभा निवडणुकीपूर्वीच (Lok Sabha elections) राज्यातील राजकीय पक्षांमध्ये मोठ्या हालचाली होऊ लागल्या आहे. यातच नगर जिल्ह्यातून एक मोठी राजकीय घडामोड समोर येत आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात असलेले निलेश लंके (Nilesh Lanke) शरद पवार गटात जाणार अशा चर्चा होत्या. या चर्चांनुसार लंके यांनी आज आपल्या गावी हांग्यावरून मोठी जय्यत तयारी करत पुणे गाठले. शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली… पत्रकार परिषद देखील पार पडली… लंके हे पवारांच्या बाजूलाच बसले होते, मात्र पक्षप्रवेशाबाबत आजही कोणतीच घोषणा झाली नाही.

शरद पवारांनी हटकतात जयंत पाटलांनी वाक्य मागे घेतले, पत्रकार परिषदेत काय घडलं? 

दरम्यान लोकसभेसाठी इच्छुक असलेले लंके यांनी एक दिवस आधी अजित पवार यांची देखील भेट घेतली. यामुळे लंके नेमक्या कोणत्या गटात आहे, त्यांचा पक्ष प्रवेश का झाला नाही? शरद पवार यांची दोनदा भेट घेतल्यानंतर देखील लंके यांचा प्रवेश का लांबला? शरद पवार यांच्या डोक्यात नेमका काय प्लॅन आहे? हे सगळे प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहिले.

लंकेकडून लोकसभेची तयारी
राष्ट्रवादीचे आमदार असलेले निलेश लंके यांनी पहिल्याच टर्ममध्ये आमदारकीला गवसणी घातली. लंके यांनी कोरोना काळात केलेल्या कामाची पवार कुटुंबियांनीही दखल घेतली होती. त्याच माध्यमातून लंके पवार कुटुंबियांच्या जवळ गेले. लंके हे शरद पवार यांचे निकटवर्तीय देखील म्हणून ओळखले जाऊ लागले. मात्र राष्ट्रवादीमध्ये झालेल्या फुटीनंतर शरद पवार गट व अजित पवार निर्माण झाला. यामध्ये लंके यांनी अजित दादांच्या बाजूने जाणे पसंत केले. मात्र लोकसभा निवडणुका जवळ येऊ लागल्या. त्यासाठी गेली वर्षभर आधीपासूनच लंके यांनी लोकसभेची तयारी देखील केली. त्यानुषंगाने त्यांनी मतदारसंघांमध्ये जनसंपर्क देखील वाढवला.

‘साहेब सांगतील तो आदेश’; पत्रकार परिषदेत लंकेंनी एकदाचं सांगूनच टाकलं

यातच गेल्या काही दिवसांपासून लंके हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या. महानाट्याचे माध्यमातून खासदार अमोल कोल्हे यांनी देखील लंके यांना राष्ट्रवादीत येण्याचे आमंत्रण दिले. दरम्यान देशात लोकसभा निवडणुकीसाठी विविध पक्षांकडून उमेदवार यादी जाहीर केली जात आहे. नुकतेच भाजपने महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावे जाहीर केली. यामध्ये भाजपकडून नगर दक्षिणेची जागा भाजपकडे आहे. भाजपकडून सुजय विखे याना उमेदवारी देखील जाहीर झाली.

तर लोकसभेची तयारी करत असलेल्या लंके यांना अहमदनगरमधून लोकसभा निवडणूक लढवायची आहे. मात्र महायुतीतून भाजपकडे असणारी ही जागा लंके यांना मिळणार नसल्याने त्यांनी देखील हालचाली सुरु केल्या. लंके हे अजित पवारांची साथ सोडत शरद पवारांच्या गटात प्रवेश करतील, असं बोलले जात होते, मात्र अद्यापही लंके यांचा पक्षप्रवेश झाला नाही आहे. विशेष म्हणजे एका आठवड्यात लंके यांनी दोनदा शरद पवार यांची भेट घेतली मात्र अद्यापही पक्षप्रवेश झाला नाही. यामुळे शरद पवार यांच्या डोक्यात नेमका प्लॅन आहे तरी काय? असा सवाल निर्माण होत आहे.

तुतारी कधी फुंकणार?
लंके यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. पत्रकार परिषदेमध्ये आपण पवारांच्या विचारांना मानतो. आजही मनानं मी त्यांच्यासोबत आहे, असे जाहीर वक्तव्य लंके यांनी केले. मात्र लंके यांनी अद्याप अजित दादांची साथ सोडली नाही. तर दुसरीकडे ते शरद पवार यांच्याशी जवळीक वाढवत आहे. त्यांच्याशी सुरु असलेल्या भेटीगाठी या पक्षांतराच्या दिशेने असलेलं त्यांचे पाऊले समजली जात आहे. मात्र पक्षप्रवेश झाला नसल्याने नगर दक्षिणमधून लंके लोकसभेची तुतारी कधी फुंकणार? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज