Nilesh Lanke : शरद पवार अन् निलेश लंकेंची भेट, पत्रकार परिषदही पण..,
Nilesh Lanke News :अजित पवार गटाच आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी आज शरद पवार (Sharad Pawar) यांची पुण्यात भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकार परिषद घेत मी साहेबांसोबत असून साहेबांची विचारधारेशी बांधील असल्याचं मोठं विधान निलेश लंके यांनी केलं आहे. या पत्रकार परिषदेत निलेश लंके यांचा शरद पवार गटात प्रवेश झाला की नाही? याबाबत अद्याप स्पष्ट समजू शकलेल नाहीत पण शरद पवारांचं नेतृत्व आम्हाला मान्य असून त्यांच्यासोबतच असल्याचं निलेश लंके यांनी यावेळी ठणकावून सांगितलं आहे.
हरिशचंद्र चव्हाणांची घरवापसी? दिंडोरीत भारती पवारांच्या विरोधात पवारांना आठवला जुना कार्यकर्ता…
दोन ते तीन दिवसांपासून निलेश लंके शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. याबाबत निलेश लंके यांना माध्यमांकडून विचारण्यात आल्यानंतर अद्याप मी कोणताही निर्णय घेतला नसल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं होतं. त्यानंतर काल भाजपकडून लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये नगर दक्षिणचे खासदार सुजय विखे यांनाही पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर आता निलेश लंके शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चांना चांगलाच ऊत आला होता.
मागील 17 वर्षांत 121 लोकांची ED चौकशी; आकडेवारी सांगत शरद पवारांचा भाजपवर घणाघात
लंकेंबाबत चर्चा सुरु असतानाच निलेश लंके यांनी आज शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली. पुस्तक प्रकाश सोहळ्यासाठी आलो असल्याचं कारणही निलेश लंके यांच्याकडून सांगण्यात आलं होतं. शरद पवार यांच्यासोबत भेट घेतल्यानंतर शरद पवार गटाकडून संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेला निलेश लंके, शरद पवार, जयंत पाटील आणि खासदार अमोल कोल्हे उपस्थित होते. एकूणच पत्रकार परिषदेवरुन लंके शरद पवार गटात जाणार असल्याचं दिसून येत होतं. मात्र, शरद पवार आमच्या ह्रदयात असून त्यांची विचारधारा आणि नेतृत्व आम्हाला मान्य आहे. आम्ही शरद पवारांसोबत असून शरद पवार जो आदेश देतील तो मान्य असल्याचं निलेश लंके यांनी यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
माध्यमांकडून निलेश लंके यांच्यासह शरद पवार यांना लंकेंच्या पक्षप्रवेशाबाबत सवाल करण्यात आले खरे पण पवार आणि लंकेंकडून कोणतीही क्लिअर भूमिका सांगण्यात आलेली नाही. त्यामुळे आता निलेश लंके यांनी नेमंक शरद पवार गटात प्रवेश केलायं, की अजित पवार गटासोबतच राहणार आहेत, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.