बारामतीत आवाज फक्त थोरल्या पवारांचाच, शरद पवार गटानं थेट व्हिडीओच दाखवला

बारामतीत आवाज फक्त थोरल्या पवारांचाच, शरद पवार गटानं थेट व्हिडीओच दाखवला

Sharad Pawar : बारामतीकरांचं (Baramati)राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर असलेलं प्रेम दाखवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर(Social media) चांगलाच व्हायरल (Video Viral)झाला आहे. हा व्हिडीओ राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून (Ncp Sharad Pawar group)शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमधून बारामतीकरांचं शरद पवार यांच्यावर किती प्रेम आहे? हे दिसत असल्याचा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे. या पोस्टमध्ये आज बारामतीमध्ये आयोजित नमो महारोजगार मेळाव्यातील (Baramati Namo Maharojgar Melava)काही क्षणचित्रे दाखवली आहेत.

..तर नेत्यांनी सांगितल्यावरही लोकसभेचे काम करणार नाही; शिवतारेंचा अजित पवारांना इशारा

राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, हे प्रेम आहे बारामतीकरांचं. कुणी कितीही सत्तेचा खटाटोप केला तरी, निष्ठावंत बारामतीकरांचं प्रेम हे बारामतीचं ज्यांनी भलं केलं त्या खासदार शरदचंद्र पवार यांच्यावरच आहे, हेच आजच्या कार्यक्रमातून पुन्हा एकदा स्पष्ट झालं.

झालं असं की, आज बारामतीमध्ये नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या कार्यक्रमातील चार सत्काराचे व्हिडीओ दाखवले आहेत. त्यातील पहिल्या व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करताना मंत्री मंगलप्रभात लोढा दिसत आहेत. त्यावेळी सर्वत्र शांतता दिसत आहे.

Sharad Pawar : “युवकांच्या रोजगाराबाबतीत आम्ही तुमच्यासोबत”; शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना शब्द

दुसऱ्या व्हिडीओमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करताना दिसत आहेत. आणि तिसऱ्या व्हिडीओमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी सर्वत्र शांतता पाहायला मिळाली. मात्र जेव्हा शरद पवार यांचा सत्कार करण्यात येतो त्यावेळी मात्र उपस्थितांमधून एकच आवाज आवाज ऐकायला मिळतो.

त्या व्हिडीओमध्ये शरद पवार उपस्थितांना पाहून अभिवादन करताना दिसतात. त्याचवेळी शरद पवारांचा सत्कार होताना पाहून उपस्थितांकडून भरभरुन दाद मिळताना दिसत आहे. त्याचबरोबर शरद पवार हे भाषण करण्यासाठी समोर येत असतानाही उपस्थितांकडून भरभरुन दाद मिळताना पाहायला मिळत आहे.

या पोस्टमधील व्हिडीओमधून बारामतीमधील टीम ही शरद पवार यांच्याच पाठिमागे असल्याचे दाखवण्यात आले आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सत्कार होत असतानाही उपस्थितांकडून कसलीही दाद मिळाली नाही. त्यामुळे बारामतीकर हे फक्त आणि फक्त शरद पवार यांच्याच पाठिमागे असल्याचा एक प्रकारे दावा करण्यात आला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज