‘आम्ही कमी पडलो अन् ‘राष्ट्रवादी’ला फायदा झाला’; बाळा भेंगडेंनी सांगितलं 2019 मध्ये कुठं चुकलं?

‘आम्ही कमी पडलो अन् ‘राष्ट्रवादी’ला फायदा झाला’; बाळा भेंगडेंनी सांगितलं 2019 मध्ये कुठं चुकलं?

BJP Leader Bala Bhegade : सन 2019 ची विधानसभा निवडणूक. सगळीकडे भाजपाची लाट. पंतप्रधान मोदींच्या नुसत्या नावावरच अनेक उमेदवार निवडून आले. पण, मावळ मतदारसंघातील निवडणूक बाळा भेगडेंना जरा जडच गेली. या निवडणुकीत असे काय घडले? कोणते डावपेच चुकले? नेमकी चूक काय घडली? याचा खुलासा खुद्द माजी आमदार बाळा भेगडेंनीच (Bala Bhegade) केला आहे. लेट्सअप चर्चा या विशेष कार्यक्रमात भेगडे यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर मते व्यक्त केली. तसेच 2019 च्या निवडणुकीत पराभव का स्वीकारावा लागला याचं कारणही सांगितलं.

2019 मध्ये असं काय झालं होतं ज्यामुळं आपला पराभव झाला असं तुम्हाला वाटतं. भाजपचं वारं होतं, त्यावेळी नेमकं काय चुकलं होतं, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. ‘राजकारणात जय पराजय होतच असतो. परंतु, आमदार सुनील शेळके त्यावेळी लोकांना चांगले उमेदवार वाटले. माझ्यापेक्षा त्यांच्याकडून जास्त अपेक्षा पूर्ण होतील असं चित्र जनतेच्या मनात तयार झालं किंवा आम्ही कमी पडलो आणि ते निवडून आले’, असे उत्तर भेगडे यांनी दिले.

तरीसुद्धा अशी कोणती चूक होती जी टाळली असती तर चित्र बदललं असतं असं तुम्हाला वाटतं? या प्रश्नावर उत्तर देताना भेगडे यांनी निवडणुकीतील पराभवाचा खुलासा केला. ते म्हणाले, ‘खरंतर मावळ मतदारसंघाचा जो पारंपारिक मतदार आहे तो भारतीय जनता पक्षाला बांधिल असलेला आहे. आमदार शेळके सु्द्धा भाजपाच्याच मुशीत वाढले होते. त्यामुळे आमच्याबरोबर काम करणारा कार्यकर्ता जरी तिकडं गेला म्हणून त्याच्यामागे काही प्रमाणात जनतेनं झुकतं माप दिलं. हेच जर आम्ही समन्वय साधून सुरुवातीलाच केलं असतं तर मावळचं चित्र पहिल्यासारखच राहिलं असतं. आमच्यातला एकमेकांतला समन्वय कमी पडला आणि त्याचा फायदा राष्ट्रवादीला झाला.’

‘मावळ’ ‘राष्ट्रवादी’कडे गेलं, तर काय करणार? बाळा भेगडेंच्या उत्तराने ‘इलेक्शन पिक्चर’ क्लिअर!

पक्षानं सांगितलं तर लोकसभेसाठीही तयार 

आता आगामी काळात मावळ लोकसभेसाठी आपलं नाव सुचवायचं असं काही तुमच्या डोक्यात आहे का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर बाळा भेगडे म्हणाले, ‘माझ्याकडे पक्षाने राज्यातल्या 48 मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे. त्यात मावळ सुद्धा आहे. उद्या जर असं ठरलं की मावळची जागा भाजपाने लढवायची आणि पक्षाच्या संसदीय मंडळाने निर्णय घेतला की ही जागा तुम्हाला लढवायची, तर एक कार्यकर्ता म्हणून मी निश्चितच तयार राहिल.’

विधानपरिषद, राज्यसभा की लोकसभा असा प्रश्न अनेकांनी मला विचारला. पण मी अत्यंत समाधानी कार्यकर्ता आहे. पक्षासाठी संघटनेचं काम करत राहणं आणि पक्षाचा कार्यकर्ता असल्याने मला संघटनेत काम करणंही तितकच आवडतं. एका सामान्य कार्यकर्त्याला आमदार, मंत्री आणि राज्याचा उपाध्यक्ष हे जे चित्र पहायला मिळालं. त्यात अनेक राज्यातल्या निवडणुकांत जबाबदारी मिळाली हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. मला यापेक्षा दुसरा कोणताच आनंद असू शकत नाही, असे बाळा भेगडे यांनी स्पष्ट केले.

‘तरीही अजितदादांना गृहखातं देणार नाही’, फडणवीसांच्या बारामतीकरांसमोर कोपरखळ्या

तुम्ही जेव्हा आमदार सुनील शेळकेंचे विरोधक होता तेव्हा गौणखनिज आणि अन्य मुद्दे लावून धरले होते. त्यांच्यावर मोठे आरोप केले होते. त्या आरोपांचे पुढे काय झाले? ‘गौणखनिजामुळे मावळमधील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. त्यासाठी मी स्वतः मोठा पाठपुरावा केला. शेवटपर्यंत लढाई लढलो. राष्ट्रीय हरित लवादाचा निकाल मात्र आमच्याविरोधात गेला.’

‘परंतु, आजही त्या ठिकाणच्या जनतेची आणि शेतकऱ्यांची भावना आहे की यामुळे नुकसान झाले. त्यामुळे ती खाण आमदारांची असो की आणखी कुणाची असो त्यांनी जर नियमात केलं तर विरोध कुणाचाच नाही. पण जर नियमाच्या बाहेर जाऊन काम केलं आणि त्यातून जर लोकांचं नुकसान होत असेल तर सगळ्यांनीच त्याचा विरोध केला पाहिजे असं मला वाटतं. मागच्या आठवड्यात एक सभा आमदारांच्या उपस्थितीत मावळ तालु्क्यात झाली. त्या सभेत आमदारांनी जर माझं चुकीचं असेल तर बंद करा’ अशी भूमिका मांडल्याची माहिती मला मिळाल्याचे माजी आमदार भेगडे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज