..तर नेत्यांनी सांगितल्यावरही लोकसभेचे काम करणार नाही; शिवतारेंचा अजित पवारांना इशारा
Vijay Shivatare : बारामतीत (Baramati) सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) उभ्या राहणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अजित पवारांनीही त्याच उमेदवार असू शकतात याचे संकेत दिले. त्यामुळेच अजित पवार हे संपूर्ण बारामती मतदारसंघ पिंजून काढत आपलाच उमेदवार निवडून देण्याचे आव्हान करत आहे. अशातच अशातच अजित पवार (Ajit Pawar) यांना ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू रंगली आहे.
Sharad Pawar : “युवकांच्या रोजगाराबाबतीत आम्ही तुमच्यासोबत”; शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना शब्द
शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी बारामतीत मोठा निर्णय जाहीर केला. त्यांनी केलेलं विधान सध्या चांगलचं चर्चेत आहे. विधानसभेच्या जागा ठरल्याशिवाय लोकसभेचे काम काही करणार नाही, नेत्यांनी सांगितले तरी काम कोण करणार नाही, असं ते म्हणाले. यामुळं अजित पवारांना मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा सुरू झाली.
Prarthana Behere : प्रार्थना बेहेरेच्या किलर स्माईलवर चाहते फिदा
आज माध्यमांशी बोलतांना शिवतारे म्हणाले की, विधानसभेच्या भूमिका स्पष्ट झाल्याशिवाय लोकसभेबाबत निर्णय नाही. विधानसभेची भूमिका आज ना उद्या स्पष्ट होईल. जोपर्यंत विधानसभेच्या बाबतीत निर्णय होत नाही, तोपर्यंत सबुरीची भूमिका घेणार आहे. ज्या दिवशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याबाबतीत स्पष्ट करतील, तेव्हा निश्चितपणे यातून मार्ग निघेल, असंही ते म्हणाले. विजय शिवतारे अजित पवारांना मोठा धक्का देण्याची तयारी करत असल्याचे यातून दिसत आहे.
शिवतारे पुढं बोलतांना म्हणाले की, त्याकाळात पक्ष वेगळे होते, आम्ही राजकीय प्रतिस्पर्धी होतो. आता परिस्थिती बदलली आहे. जर तुम्ही एकमेकांच्या हिताचा विचार केला तर लोक मदत करतील आणि जर तुम्ही एकमेकांच्या हिताचा विचार केला नाही तर अगदी नेत्यांनी सांगितलं तरी लोक ऐकतील अशी परिस्थिती नाही. त्यामुळं विधानसभेची खात्री देणार असाल तरच लोकसभेसाठी काम करू, असं शिवतारे म्हणाले.
आपल्यासोबत शरद पवार किंवा अजित पवार कुणाचंही बोलणं झालेलं नाही, असंही ते म्हणाले. महायुतीत असल्याने अजित पवार यांच्याशी गाठीभेटी होतात, मात्र, लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने कुणाशी भेटीगाठी किंवा चर्चा झाली नसल्याचं शिवतारेंनी स्पष्ट केलं.