हरिशचंद्र चव्हाणांची घरवापसी? दिंडोरीत भारती पवारांच्या विरोधात पवारांना आठवला जुना कार्यकर्ता…
नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दिंडोरी मतदारसंघातून (Dindori Lok Sabha) भाजपने (BJP) विद्यमान खासदार आणि केंद्रीय भारती पवार (Bharati Pawar) यांनाच पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला असून भाजपमध्ये नाराज असलेले माजी खासदार हरिशचंद्र चव्हाण (Harishchandra Chavan) यांची राष्ट्रवादीमध्ये घरवापसी होणार असल्याची चर्चा आहे. आज (14 मार्च) राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर या चर्चांना सुरुवात झाली आहे.
2009 मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी हरिशचंद्र चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला आणि लोकसभेची उमेदवारीही मिळवली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना कार्यकर्त्यांमध्ये बसवलेला जम, तगडा जनसंपर्क आणि शिवसेनेची चांगली साथ याच्या आधारे त्यांनी पहिल्याच फटक्यात विजय मिळविला. 2014 मध्येही भाजपने चव्हाण यांना दुसऱ्यांदा संधी दिली. 2019 मध्ये मात्र राष्ट्रवादीतूनच आलेल्या डॉ. भारती पवार यांना भाजपने मैदानात उतरविले आणि विजयीही झाल्या. पुढे 2021 मध्ये नरेंद्र मोदी यांनी आरोग्य खात्याच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारीही दिली.
मागील 17 वर्षांत 121 लोकांची ED चौकशी; आकडेवारी सांगत शरद पवारांचा भाजपवर घणाघात
त्यानंतर यंदा चव्हाण यांनी पुन्हा एकदा उमेदवारीसाठी प्रयत्न सुरु केले होते. मात्र पक्षाकडून त्यांना फारसा सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता. त्यातून ते पक्षापासून लांब जाऊ लागले होते. अखेरीस काल सायंकाळी भाजपने त्यांची लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यात महाराष्ट्रातील 20 उमेदवारांचा समावेश होता. यातच दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार आणि केंद्रीय भारती पवार यांनाच पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे माजी खासदार हरिशचंद्र चव्हाण यांची राष्ट्रवादीमध्ये घरवापसी होणार असल्याची चर्चा आहे.
‘शिवधनुष्य सोडा, 40 जणांच्या दाढीचं वजन पेला’; जागावाटपावरुन ठाकरेंचा शिंदेंना खोचक टोला
‘नाशिक’मध्ये ठाकरे गट, ‘दिंडोरी’त आमचा उमेदवार; शरद पवारांनी सोडवलं उमेदवारीचं गणित
जागावाटपात नाशिक लोकसभा मतदारसंघ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडे आहे. तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) उमेदवार देणार आहे, अशी मोठी घोषणा स्वतः शरद पवार यांनी केली आहे. त्यामुळेच दिंडोरीसाठी चव्हाण यांच्या नावाचा पवार यांच्याकडून विचार सुरु असून त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचेही सांगितले जात आहे.