‘शिवधनुष्य सोडा, 40 जणांच्या दाढीचं वजन पेला’; जागावाटपावरुन ठाकरेंचा शिंदेंना खोचक टोला

‘शिवधनुष्य सोडा, 40 जणांच्या दाढीचं वजन पेला’; जागावाटपावरुन ठाकरेंचा शिंदेंना खोचक टोला

Udhav Thackeray On Shinde Group : शिवधनुष्य सोडा, 40 जणांच्या दाढीचं वजन पेला, असा टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना लगावला आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून राज्यभरात जनसंवादाचं आयोजन करण्यात येत आहे. वाशिममध्ये आज उद्धव ठाकरेंची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होतं. जाहीर सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाचे आमदार संजय राठोड आणि खासदार भावना गवळी यांच्यावरही जोरदार निशाणा साधला आहे.

“दिल्लीत वजन वापरा, मला भीतीतून मुक्त करा”; तिकीट कापण्यासाठी मुनगंटीवारांचं CM शिंदेंना साकडं

उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेना हे नाव तुम्ही दिलेले नाही, ना तो धोंड्या निवडणूक आयुक्ताने दिलं तर ते माझ्या आजोबा आणि वडिलांनी दिलं आहे. प्रभू श्रीरामचंद्राचा धनुष्यबाण आम्ही घेतला होता, तो धनुष्यबाण आता तुम्ही कलोषित करुन टाकला आहे. आता चोरांच्या हाती धनुष्यबाण गेला आहे. रावणाला धनुष्यबाण नाही पेललं मिधेंना पेलणार का? त्यांना त्यांच्या दाढीचं वजन नाही पेलतं आत्ताचं जागावाटपावरुन उताणे झाले असल्याच टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

‘रोहित पवारांनी नकार दिला म्हणून लंकेंना गळ’; अजितदादांच्या शिलेदारानं सांगितलं शरद पवारांचं प्लॅनिंग

तसेच यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी खासदार भावना गवळी यांच्यावरही निशाणा साधला आहे. ते म्हणाले, राखी बांधणाऱ्या बहिणीचा भ्रष्टाचार पंतप्रधान मोदी यांनी झाकून टाकला आहे. याआधी भावना गवळी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राखी बांधली होती. त्यावरुन उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला आहे.

कीर्तीकरांच्या उमेदवारीवरुन महाविकास आघाडीत ‘मिठाचा खडा’, संजय निरुपम यांची ठाकरेंवर टीका

तर शिंदे गटाचे आमदार संजय राठोड यांच्यावरही उद्धव ठाकरे यांचा तोल गेला आहे. संजय राठोड यांनी बंजारा समाजाचा भूखंड गद्दारांच्या खिशात घातला असल्याचा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांच्यावर केला आहे. तुम्ही समाजाला फसवतं आहात आता समाजाला फसवल्यानंतर समाज यांना मते देणार आहे का? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज