OTT Platform Ban: अश्लील कंटेंट दाखवणाऱ्या 18 ओटीटी, 19 वेबसाइट अन् 10 ॲप्सवर मोठी कारवाई

OTT Platform Ban: अश्लील कंटेंट दाखवणाऱ्या 18 ओटीटी, 19 वेबसाइट अन् 10 ॲप्सवर मोठी कारवाई

OTT Platform Ban in India: सोशल मीडिया (Social media) आणि ओटीटी हे असे प्लॅटफॉर्म (OTT Platform) आहेत जे प्रत्येक घरात आहेत. आजकाल वेबसाइट्स (websites) आणि ॲप्सच्या माध्यमातून तुम्ही घरात बसून तुम्हाला हवे ते पाहू शकता. पण त्यांचा गैरवापर करणाऱ्यांची संख्या देखील कमी नाही. अनेक वेबसाइट्स, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि ॲप्स आहेत जे लोकांपर्यंत अश्लील सामग्री पोहोचवतात. याप्रकरणी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने मोठे पाऊल उचलले आहे. कारवाई करत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 18 ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म, 19 वेबसाइट आणि 10 ॲप्सवर बंदी घालण्यात आली आहे.

एवढेच नाही तर 57 सोशल मीडिया हँडलही ब्लॉक करण्यात आले आहेत. भारत सरकारच्या म्हणण्यानुसार, या सर्व साइट्स आणि ओटीटी प्लॅटफॉर्मने आयटी कायद्याचे उल्लंघन केले आहे. शिवाय हे ऑनलाइन प्लॅटफॉर्म भारतीय दंड संहितेचेही उल्लंघन करत होते. सरकारचा असाही दावा आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून हे ओटीटी प्लॅटफॉर्म आणि वेबसाइट महिलांची प्रतिमा मलिन करणारी सामग्री दाखवत आहेत. केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर (Anurag Singh Thakur) यांनी 12 मार्च 2024 रोजी ही घोषणा केली आहे.

ज्या हँडलला ब्लॉक आणि बॅन करण्यात आले आहे, त्यापैकी काहींचे 1 कोटी यूजर्स होते तर काहींचे 15 लाख यूजर्स होते. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने याबाबत कायदेतज्ज्ञ आणि तज्ज्ञ समितीशी चर्चा केल्यानंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एएनआयने (ANI) आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक यादीही शेअर केली आहे.

मधुसूदन कालेलकर जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष नाटय महोत्सवाचे आयोजन

या सामायिक केलेल्या यादीमध्ये, त्या सर्व OTT प्लॅटफॉर्म, ॲप्स, वेबसाइट्सची नावे नमूद करण्यात आले आहेत, ज्यांना भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने प्रतिबंधित आणि अवरोधित केले आहे. अश्लील मजकुराचा तरुणांवर वाईट परिणाम होत असल्याचे सरकारचे मत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube