Hanuman OTT Release : बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा ‘हनुमान’ ओटीटीवर येणार
Hanuman OTT Release: बऱ्याच वेळा, कमी बजेटमध्ये बनवलेले असे अनेक चित्रपट प्रदर्शित होतात, जे त्यांच्या खर्चापेक्षा बॉक्स ऑफिसवर (Box Office) जास्त पैसे कमवताना दिसतात. असाच एक चित्रपट म्हणजे ‘हनुमान’ (Hanuman Movie) हा चित्रपट 12 जानेवारीला प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रशांत वर्मा (Prashant Varma) यांनी दिग्दर्शित केला होता आणि त्यात तेजा सज्जा मुख्य भूमिकेत पाहायला मिळाला. चाहत्यांना हा चित्रपट खूप आवडला आणि आता त्याच्या ओटीटी रिलीजची प्रतीक्षा अनेक दिवसापासून करत आहेत.
यापूर्वी अशी चर्चा होती की हा चित्रपट 8 मार्चपासून ZEE5 वर प्रसारित होणार आहे, परंतु तसे झाले नाही. मात्र आता पुन्हा एकदा नवीन रिलीज डेटसह हा चित्रपट चर्चेत आला आहे. 11 मार्च रोजी चित्रपटाच्या दिग्दर्शकाने ट्विट करून हनुमानाच्या ओटीटी स्ट्रीमिंगची तारीख लवकरच घोषित केली जाईल, असे सांगितले होते.
आता चर्चा सुरू आहे की हा चित्रपट 16 मार्चला ओटीटीवर प्रदर्शित होणार का ? निर्मात्यांनी अद्याप अधिकृतपणे काहीही सांगितले नाही. दक्षिण भाषांमधला हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म ZEE5 वर प्रदर्शित होईल आणि त्याचे हिंदी व्हर्जन जिओ सिनेमावर स्ट्रीम केले जाईल, असेही सांगितले जात आहे.
नीरज पांडे ते मोजेझ सिंग, अनोख्या चित्रपट निर्मितीने जिंकली प्रेक्षकांची मनं
हनुमानाने किती कमाई केली? हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये खूप आवडला. रिपोर्ट्सनुसार, हा पिक्चर बनवण्यासाठी सुमारे 40 कोटी रुपये खर्च आला होता, पण त्याच्या कमाईने बॉक्स ऑफिसला हादरवले होते. या चित्रपटाने जगभरात 330 कोटींहून अधिक कमाई केली. मात्र, पहिल्या भागाच्या यशानंतर निर्मात्यांनी त्याचा दुसरा भागही जाहीर केला आहे. ‘हनुमान’ रिलीज झाल्यानंतर अवघ्या 10 दिवसांनी, निर्मात्यांनी घोषणा केली होती की या चित्रपटाचा एक सिक्वेल देखील येणार आहे, ज्याचे शीर्षक ‘जय हनुमान’ असणार आहे.