Box Office Collection: ‘शैतान’चा बॉक्स ऑफिसवर डंका! अवघ्या 3 दिवसांत छप्परफाड कमाई

Box Office Collection: ‘शैतान’चा बॉक्स ऑफिसवर डंका! अवघ्या 3 दिवसांत छप्परफाड कमाई

Shaitaan Box Office Collection 3: अजय देवगणचा (Ajay Devgn) ‘शैतान’ (Shaitaan Movie) हा चित्रपट 8 मार्चला थिएटरमध्ये दाखल झाला आहे. ‘शैतान’ने पहिल्याच दिवशी चांगली कमाई करत(Box Office) अजय देवगणच्या ‘तान्हाजी’चा रेकॉर्ड मोडला. या चित्रपटाची सुरुवात जवळपास 15 कोटी रुपयांपासून झाली होती. दुसऱ्या दिवशीही या चित्रपटाने चांगली कमाई केली. आता चित्रपटाच्या तिसऱ्या दिवसाचे कलेक्शन पाहता हा चित्रपट ‘दृश्यम 2’ चा रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे.

बॉक्स ऑफिसवर ‘शैतान’ची जादू कायम आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 8 मार्चला रिलीज झालेल्या अजय देवगण आणि आर माधवनच्या (R Madhavan) चित्रपटाने तिसऱ्या दिवशीच बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. Sacknilk च्या रिपोर्टनुसार, ‘शैतान’ने 14 कोटी 75 लाख रुपयांच्या कमाईसह चांगली सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाला चांगले कलेक्शन मिळाले. दुस-या दिवशी चित्रपटाच्या कमाईत झेप घेतली असून दुसऱ्या दिवशी चित्रपटाने 18 कोटी 75 लाखांची कमाई केली आहे. तिसऱ्या दिवसाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर, चित्रपटाने एकट्या भारतात 20 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Nana Patekar : कोण वायकर ? ‘नाना’ स्टाईल उलटं प्रश्न अन् राजकीय मुद्यावरून खुली ऑफर

‘या’ चित्रपटांना हरवले: अजय देवगण आणि आर माधवन यांच्या चित्रपटाने 1 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या ‘लापता लेडीज’ला कमाईच्या बाबतीत खूपच मागे टाकले आहे. आमिर खान आणि किरण रावचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार काही कमाल दाखवू शकला नाही. या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात केवळ 9 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्याचवेळी, अजय आणि आर माधवनच्या ‘शैतान’चा दबदबा असा आहे की, तिसऱ्या दिवशीच या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 53 कोटी 5 लाख रुपयांची कमाई केली आहे. यासोबतच थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘भीमा’ आणि ‘गामी’लाही ‘शैतान’ने पराभूत केले आहे. ‘भीमा’ने 6 कोटी 43 लाख तर गामीने 9 कोटी 8 लाखांची कमाई केली आहे.

चित्रपटाची कथा: चित्रपटाच्या कथेबद्दल सांगायचे तर, आर माधवनने चित्रपटात ‘शैतान’ची भूमिका केली आहे, ज्याने अजय देवगणच्या मुलीला काळ्या जादूद्वारे आपल्या ताब्यात घेतले आहे. अजय देवगण आपल्या मुलीला सैतानाच्या तावडीतून बाहेर काढण्याच्या प्रयत्नात व्यस्त आहे. यावर एक चित्रपट आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज