‘आनंदाच्या शिध्यात’ देणार व्हिस्की अन् बिअर, महिला उमदेवाराचं अजब आश्वासन

‘आनंदाच्या शिध्यात’ देणार व्हिस्की अन् बिअर, महिला उमदेवाराचं अजब आश्वासन

Vanita Raut promised whiskey and beer : सध्या देशात लोकसभा निवडणुकांची (Lok Sabha elections) रणधुमाळी सुरू आहे. अनेक राजकीय पक्षांचे उमेदवार विविध आश्वासने आणि आमिष दाखवत मतदारांची मते मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. असाच एक प्रयत्न चंद्रपूर लोकसभा (Chandrapur Lok Sabha) मतदारसंघातून उभ्या असलेल्या वनिता राऊत (Vanita Raut) यांनी केला आहे. त्यांनी दिलेल्या आश्वासनाने तळीरामांचा आनंद गगनात मावेना. राऊत यांनी चक्क आनंदाच्या शिध्यात व्हिस्की आणि बिअर देण्याचं आश्वासन मतदारांना दिलं.

Munmun Dutta : बबिताचा वेस्टर्न आऊटफिटमध्ये स्टायलिश अंदाज, दिलखेच अदांनी चाहते घायाळ 

वनिता राऊत म्हणाल्या, फक्त श्रीमंतांनीच महागडी व्हिस्की आणि बिअर का प्यावी? देशी दारू पिणाऱ्यांनाही अधूनमधून चांगली दारू प्यायला मिळावी. खासदार म्हणून आल्यास चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील मतदारांना आनंदाच्या शिध्यात व्हिस्की आणि बिअर देणार, असं आश्वासन राऊत यांनी दिलं. निवडून आल्यानंतर ‘गाव तिथेबिअर बार’ सुरू करून बेरोजगारांना बिअरबारचे परवाने वाटप करण्याचे आश्वासन दिले.

चिंधी बांधून लंका जाळण्याच्या भानगडीत पडू नका; गिरीश महाजनांना शिरसाटांचा टोमणा 

चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघात एकूण 15 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये काँग्रेस, भाजप, वंचित अशा प्रमुख पक्षांचा समावेश आहे. मात्र, चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात सध्या चर्चा आहे ती अखिल भारतीय मानवता पक्षाच्या उमेदवार वनिता जितेंद्र राऊत यांची. विकासकामांची आश्वासने देऊन नेते जनतेसमोर उभे राहतात. मात्र, याला वनिता राऊत अपवाद ठरल्या आहेत. गावात तिथे बिअर बार उघडू, बेरोजगारांना बिअर बारचच परवाने देऊ, असं आश्वासन त्या देत आहेत.

वनिता राऊत या सिंदेवाही तालुक्यातील पेंढरी गावच्या रहिवासी आहेत. त्यांनी यापूर्वी 2019 ची लोकसभा आणि 2019 ची चिमूर विधानसभा निवडणूक लढवली आहे. दोन्ही वेळा त्यांचे डिपॉजिट जप्त झाले होते.

गाव तिथे दारूचे दुकान असे धोरण त्यांचे आहे. समाजाला दारूपासून वंचित ठेवणे ही मोठी चूक आहे, असं त्या म्हणतात. दरम्यान, श्रीमंतांप्रमाणेच गरिबांना देखील महागडी व्हिस्की आणि बिअर मिळायला हवी. या हेतून त्यांना आनंदाच्या शिध्यात अत्यल्प दरात व्हिस्की-बिअर देण्याचे आश्वासन राऊत यांनी दिले आहे. त्यामुळे त्यांच्या या आश्वासनाला मतदार त्यांना कितपत साथ देतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज