आनंदाची बातमी! व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात, आजपासून नवीन दर लागू होणार

आनंदाची बातमी! व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात, आजपासून नवीन दर लागू होणार

Commercial Gas Cylinder Prices Cut : एलपीजी गॅस (LPG Gas) सिलिंडरबद्दल एक मोठी बातमी आहे. लोकांच्या सोयीसाठी तेल विपणन कंपन्यांनी पुन्हा एकदा गॅस सिलिंडरच्या किमती कमी केल्या आहेत. यावेळी किमती 51 रुपयांनी कमी करण्यात आल्या (Gas Cylinder Prices) आहेत. परंतु, ही कपात फक्त 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरमध्ये करण्यात आली आहे.

या बदलानंतर, दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची (Commercial Gas Cylinder) किंमत 1580 रुपये होईल. आतापर्यंत दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरची किंमत 1631.50 रुपये आहे. नवीन किमती आजपासून म्हणजेच 1 सप्टेंबरपासून लागू होतील.

सप्टेंबरची धमाकेदार सुरुवात! पहिल्याच दिवशी अनेक राशींवर धनलाभाचा वर्षाव, घ्या जाणून…

एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल

प्रत्यक्षात, तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमती बदलल्या आहेत. आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 51.50 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. दिल्लीत, 1 सप्टेंबर (आज) पासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किरकोळ विक्री किंमत 1580 रुपये असेल. 14.2 किलोच्या घरगुती सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.

या वर्षी किमती सातत्याने कमी झाल्या

मार्च महिना वगळता, 1 जानेवारी 2025 पासून 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती सातत्याने कमी केल्या जात आहेत. 1 जानेवारी रोजी त्यात 14.50 रुपयांची कपात करण्यात आली. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये 7 रुपयांची कपात करण्यात आली होती.

आजपासून पाणी बंद! जरांगे पाटलांचा मोठा निर्णय; आझाद मैदानावर मराठा आंदोलन तापलं, उपोषणाचा चौथा दिवस

मार्चमध्ये किमती वाढल्या होत्या

1 मार्च रोजी किमतीतही 6 रुपयांची वाढ करण्यात आली. त्यानंतर 1 एप्रिल रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी कपात करत 41 रुपयांची कपात करण्यात आली. त्यानंतर 1 मे रोजी 14 रुपये आणि 1 जून रोजी 24 रुपयांची कपात करण्यात आली. 1 जुलै रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत 58.50 रुपयांची मोठी कपात करण्यात आली. त्यानंतर 1 ऑगस्ट रोजी पुन्हा 33.50 रुपयांची कपात करण्यात आली. आता पुन्हा एकदा किमती कमी करण्यात आल्या आहेत.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube