आजपासून पाणी बंद! जरांगे पाटलांचा मोठा निर्णय; आझाद मैदानावर मराठा आंदोलन तापलं, उपोषणाचा चौथा दिवस

आजपासून पाणी बंद! जरांगे पाटलांचा मोठा निर्णय; आझाद मैदानावर मराठा आंदोलन तापलं, उपोषणाचा चौथा दिवस

Manoj Jarange Patil Maratha Reservation Protest : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुरु असलेल्या आंदोलनात आज निर्णायक घडामोडी घडल्या आहेत. मुंबईच्या आझाद मैदानावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सुरु केलेल्या उपोषणाचा आज (1 सप्टेंबर) चौथा दिवस आहे. या आंदोलनाला अद्याप ठोस तोडगा न निघाल्यामुळे जरांगे पाटील यांनी उपोषण अधिक कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आजपासून पाणी पिण्यास नकार देत ‘पाणीत्याग’ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे मराठा आंदोलनाची तीव्रता ( Maratha Reservation Protest) अधिक वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पाणी सोडण्याचा निर्णय

याआधीच्या तपासणीत डॉक्टरांनी त्यांना नियमित पाणी प्यावे, ओआरएस घ्यावे, अशी सूचना केली होती. परंतु त्यानंतरही जरांगे यांनी पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या आरोग्याबद्दल चिंता व्यक्त होत आहे. डॉक्टरांच्या टीमकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या त्यांची शुगरची पातळी केवळ 70 च्या आसपास असून, पाण्याचा त्याग केल्यास त्यांची प्रकृती आणखी खालावू शकते.

…तर पाहू काय करायचं ते, सुप्रिया सुळेंना आझाद मैदानात आंदोलकांचा घेराव, जरांगे पाटील काय म्हणाले?

सर्व मार्ग वाहतुकीसाठी बंद

दरम्यान, आझाद मैदानाजवळ आणि सीएसएमटी स्थानकाबाहेर मराठा बांधवांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक विभागाने विशेष उपाययोजना केल्या आहेत. आजपासून मुंबई सीएसएमटी व पालिका मुख्यालयाच्या दिशेने जाणारे सर्व मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर आझाद मैदान, मरीन ड्राईव्ह, पायधुनी आणि वडाळा वाहतूक पोलिसांना अतिरिक्त मनुष्यबळ देण्यात आले आहे.

मोठी बातमी! जरांगे पाटलांची ‘सरसकट’वरून माघार, सातारा अन् हैदराबाद संस्थानमध्ये मराठवाडा बसतो

70 अतिरिक्त पोलिसांची कुमक तैनात

मिळालेल्या माहितीनुसार, वडाळा आणि आझाद मैदान वाहतूक पोलिस चौक्यांना प्रत्येकी 35 अशा एकूण 70 अतिरिक्त पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली आहे. वाढत्या गर्दीमुळे या परिसरात सुरक्षेची आणि शिस्तबद्ध वाहतुकीची विशेष काळजी घेतली जात आहे.

मराठा समाजाचे मोठ्या प्रमाणावर जमलेले जमाव, सरकारकडून वाढलेली हालचाल आणि जरांगे यांची आरोग्य स्थिती या तिन्ही गोष्टींमुळे पुढील काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला मिळणारा प्रतिसाद आणि सरकारकडून होणारे निर्णय यावरच मराठा आंदोलनाची पुढील दिशा अवलंबून राहणार आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube