टीम इंडियाच्या प्रॅक्टिस मॅच पावसाने धुतल्या; वर्ल्ड कपमध्ये असे होईल नुकसान
World Cup 2023 : पाच ऑक्टोबरपासून आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेला (World Cup 2023) सुरुवात होत आहे. त्यापूर्वी भारताला नेदरलँड आणि इंग्लंड विरुद्ध सराव सामने खेळायचे होते. पण दोन्ही सराव सामने पावसामुळे रद्द झाले आहे. त्यामुळे आता भारतीय टीम कोणताही सराव न करता थेट ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे.
ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियम, तिरुअनंतपुरम येथे भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील सामना खेळवला जाणार होता, परंतु पावसामुळे एकही चेंडू न टाकता सामना रद्द करावा लागला. यापूर्वी भारत आणि इंग्लंड यांच्यातील सराव सामना पावसामुळे रद्द झाला होता. यामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला विश्वचषकापूर्वी सरावाची संधी मिळाली नाही.
विश्वचषकापूर्वी सरावाची संधी नाही
याआधी भारत आणि इंग्लंड यांच्यात 30 सप्टेंबरला गुवाहाटी येथे सामना होणार होता, मात्र पावसामुळे सामना रद्द करावा लागला होता. मात्र, आता विश्वचषकात भारतीय संघाचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना 8 ऑक्टोबरला होणार आहे.
चेन्नईच्या मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. मात्र, विश्वचषकाचा पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात 5 ऑक्टोबरला होणार आहे. भारतीय संघ आपल्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने करणार आहे.
मोदी कुठेही गेले तरी गर्दी पण शरद पवार..,; देवेंद्र फडणवीसांचा टोमणा
विश्वचषकात भारत ‘या’ संघांशी खेळणार…
यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आपला दुसरा सामना अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार आहे. भारत आणि अफगाणिस्तानचे संघ 11 ऑक्टोबरला दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर आमनेसामने येणार आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 14 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.
Lahore 1947: सनी पाजी अन् आमिर खान आले एकत्र; दिसणार ‘या’ नव्या भूमिकेत
उभय संघांमधील सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. या संघांशिवाय भारतीय संघ बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि नेदरलँड या संघांशी भिडणार आहे. तर या स्पर्धेचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
आतापर्यंत वर्ल्डकपमधील सराव सामने खेळणाऱ्या कोणत्याही संघाचे दोन्ही सामने रद्द झाले नाहीत. ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड यांच्यातील सराव सामना रद्द झाला होता. पण त्याआधी ऑस्ट्रेलियाचा डाव झाला होता आणि नेदरलँडने काही षटके फलंदाजी केली होती. अन्य काही संघाचे सामने पावसामुळे रद्द झाले झालेत. मात्र भारतीय संघाला एकही सराव सामना खेळण्यास मिळाला नाही.