Maharashtra Weather Update : आज राज्यात तापमान घटणार; हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज
Maharashtra Weather Update : अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा (Maharashtra Weather Update) निर्माण झाल्याने राज्यासह देशभरामध्ये सध्या ढगाळ वातावरण पाहायला मिळाले होते. गेल्या चार दिवसांत राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरीही लावली होती. त्यामुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर लोकांची तारांबळ उडाली होती. त्यानंतर आता पुन्हा हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला होता. मात्र आज राज्यात तापमान घटण्याची शक्यता आहे.
IND VS NZ : सेमीफायनलच्या तिकीटांचा काळाबाजार; चौपट दरांत विक्री करणारा एक जण ताब्यात
दरम्यान आता ढगाळ वातावरण विरून गेले आहे. त्यामुळे तापमानात घट होण्याची शक्यता आहे. तर हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज देखील व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान सध्या हवी तशी थंडी पडली नसल्याने शेतीच्या कामांची प्रतिक्षा आहे. त्यात आता तापमानात घट होऊन थंडी पडणार असल्याने शेतीच्या कामांना देखील वेग येण्याची शक्यता आहे.
Diwali 2023 : …म्हणून दिवाळीच्या पाडव्याला ‘बलिप्रतिपदा’ही म्हणतात
दुसरीकडे राज्यात ऑक्टोबर महिन्यात थंडीचं आगमन झालं होतं. वातावरणात गारठा (Rain Alert) वाढू लागला होता. त्यामुळे खरीप हंगामातील पिके काढणीला आल्याने शेतकऱ्यांनी या कामाला वेग दिला होता. दिवाळीचा सणही (Diwali 2023) सुरू आहे. त्यातच राज्यात अवकाळी पावसाचं (Rain Alert) संकट घोंगावत होतं. कारण अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता.
त्यामुळे राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा (Heavy Rain) अंदाज व्यक्त करण्यात आला होता. या दिवसांत पाऊस होत नाही. पिके काढणीची कामे वेगात सुरू असतात नेमक्या त्याचवेळी अवकाळी पावसाचे संकट निर्माण झाले होते. मात्र आता ढगाळ वातावरण विरून गेले आहे. त्यामुळे तापमानात घट होण्याची शक्यता आहे. तर हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज देखील व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी पेरण्यांसाठी शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
दुसरीकडे बंगालच्या उपसागरामध्ये वाऱ्याची चक्रिय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन येत्या चार दिवसांत चक्रीवादळ येण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे. कारण मोसमी पावसानंतरचा आणि आधीचा काळ अशा वादळांसाठी पोषक असतो. त्यात गेल्यावर्षी देखईल असंच बंगालच्या उपसागरामध्येच सितरंग नावाचं चक्रीवादळ निर्माण झालं होतं.