EVM मध्ये फेरफार म्हणून भाजपला 10 टक्यांचा लाभ, रोहित पवारांचा खळबळजनक दावा

  • Written By: Published:
EVM मध्ये फेरफार म्हणून भाजपला 10 टक्यांचा लाभ, रोहित पवारांचा खळबळजनक दावा

Rohit Pawar On EVM : राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीकडून ईव्हीएममध्ये (EVM) घोळ करण्यात आला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. महायुतीने राज्यात 288 पैकी 236 जागा जिंकल्यानंतर ईव्हीएममध्ये घोळ झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर आता कर्जत – जामखेडचे आमदार आणि राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCPSP) नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पुन्हा एकदा ईव्हीएममध्ये घोळ झाल्याने भाजपला विधानसभा निवडणुकीत 10 टक्यांचा लाभ झाला असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.

माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत भाजपचा 88.6 टक्के स्ट्राईक रेट होता आणि महायुतीचा एकत्रित 81 टक्के स्ट्राईक रेट राहीला आहे. तर महायुतीचा स्ट्राईक रेट लोकसभेत तीस टक्यांच्या आसपास होता. या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार जिथे होते तिथे 10 टक्यांचा लाभ ईव्हीएममध्ये फेरफार करुन झाला असल्याचे दिसत आहे तर अजित पवार आणि शिंदे यांचे उमेदवार होते तिथे 8 टक्के फेरफार झाल्याचे दिसते. असा दावा माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी केला. तसेच माळशिरसमध्ये उत्तम जानकर एका गावात बॅलेट पेपरवर मतदान करणार आहेत. त्यातुन सत्य बाहेर येईल. असेही रोहित पवार म्हणाले.

पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की, लातुर ग्रामीणमध्ये भाजप उमेदवारांना जवळपास समान मतदान झाले आहे. हा फक्त योगायोग नाही. त्यामागे काहीतरी गडबड आहे. ईव्हीमबाबतीत कॅाग्रेस पुढाकार घेत आहे. आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. उद्धव ठाकरे देखील याबाबत सकारात्मक असतील. असं देखील रोहित पवार म्हणाले. तसेच भाजपने विधानसभा निवडणुकीत 100 आमदार किंवा त्यांच्या नातेवाईकांना संधी दिली होती आणि त्यापैकी 95 निवडून आले. असेही रोहित पवार म्हणाले.

तर ⁠लाडक्या बहीण योजनेचा नक्कीच लाभ या निवडणुकीत भाजपला झाला मात्र आता भाजपकडून लाडकी बहीण योजनेसाठी अटीशर्ती टाकण्याची तयारी सुरु झाली आहे.असा दावा देखील माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी केला.

रोहीत पाटील यांना मुख्य प्रतोदपदी नियुक्ती देण्याची मीच शिफारस केली

तसेच यावेळी बोलताना रोहीत पाटील यांना मुख्य प्रतोदपदी नियुक्ती देण्याची मीच शिफारस केली होती. मीच तो प्रस्ताव मांडला होता. आमच्या सर्वांची त्याला संमती आहे. आमच्याकडे एकतर नेते राहीलेले नाही. मुख्य प्रतोद महत्वाचे पद आहे. आम्ही त्यांना मार्गदर्शन करु आणि पक्ष भविष्यात मला योग्य पद देईल. असेही रोहित पवार म्हणाले.

जबरदस्त! The Railway Men ने जिंकले सहा Filmfare OTT Awards

अमोल मिटकरी चंगुमंगु

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांच्यावर टीका करत रोहित पवार म्हणाले की, अमोल मिटकरी चंगुमंगु, त्यांच्यावर उत्तर देणार नाही. टीव्हीवर येणासाठी ते माझ्यावर बोलतात. त्यामुळे त्यांच्या टीकेला उत्तर देणार नाही. असा टोला रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना अमोल मिटकरी यांना लावला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube