मारकडवाडीतील मतदारांना ईव्हीएमवर शंका, बॅलेट पेपरवर घेणार पुन्हा मतदान, उत्तमराव जानकरांची माहिती…

  • Written By: Published:
मारकडवाडीतील मतदारांना ईव्हीएमवर शंका, बॅलेट पेपरवर घेणार पुन्हा मतदान, उत्तमराव जानकरांची माहिती…

Uttamrao Jankar : माळशिरस विधानसभा (Malshiras Assembly) मतदारसंघातील शरद पवार गटाचे उमेदवार उत्तमराव जानक (Uttamrao Jankar) यांचा विजय झाला. मात्र त्यांना मारकडवाडी (Markat Wadi) गावात अत्यल्प मते मिळाली. गावकऱ्यांनी ईव्हीएम (EVM) मशीनवर शंका घेत मंगळवारी 3 डिसेंबर रोजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती उत्तमराव जानकर यांनी दिली.

शिक्रापूरमध्ये हत्येचा थरार! दिवसाढवळ्या शिंदे गटाच्या नेत्याची हत्या, आरोपी फरार… 

विधानसभा निवडणुकीत महायुतीने 230 हून अधिक जागा जिंकून मोठं यश मिळवलं. मात्र या विजयावर विरोधक शंका उपस्थित करत आहेत. ईव्हीएमम घोळ करून जागा वाढवल्याचा आरोप होतोय. माळशिरस मतदारसंघातील मारकडवाडी गावात उत्तमराव जानकरांनी कमी मते मिळाली. आजपर्यंत गावात शरद पवार गटाचे उत्तम जानकर यांना कायम लीड मिळत होते. मात्र यंदा गावात सर्वाधिक मतदान राम सातपुतेंना झालं. यामुळे गावातील जानकर गटाने स्वखर्चाने बॅलेट पेपरवर मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या मंगळवारी गावात मतदान होणार आहे.

याबाबत बोलताना उत्तमराव जानकर म्हणाले की, गावकऱ्यांचं म्हणणं आहे की, आम्हाला मत शोधण्याचा अधिकार का नाही? आम्ही जर जानकरांना मते दिली असतील तर ती जानकारांनाच जायला हवीत. त्यांचं मताधिक्य का कमी झालं? आमचं मत जानकरांना गेलं नसेल तर मग गेलं तरी कुणाला? असा सवाल ग्रामस्थ करत आहे.

श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद मिळणार का? एकनाथ शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं… 

ईव्हीएम मशीनवर मतदान घेण्याची प्रक्रियाच मारकडवाडील मतदारांना वाटतंय. निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजेत, अशी गावकऱ्यांची भूमिका आहे. त्यामुळं गावकरी बॅलेट पेपरवर मतदारन घेणार आहोत. मंगळवारी (3 डिसेंबरला) सकाळी 8 वाजेपासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. ही सर्व प्रक्रिया मीडियासमोरच होणार आहे, असं जानकर म्हणाले.

यंदा माळशिरस विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे उत्तम जानकर आणि भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्यात लढत झाली. या लढतीत उत्तम जानकर यांना 1 लाख 21 हजार 713 मते मिळाली. तर राम सातपुते यांना 1 लाख 8 हजार 566 मते मिळाली. सातपुते यांचा 13 हजार 147 मतांनी पराभव झाला.

मारकडवाडीत कोणाला किती मते ?

जानकर गटाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत जानकर यांना गावातून केवळ 843 मते पडले आहेत. तर सातपुते यांना 1003 मते मिळाली. तर यापूर्वी 2009, 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत जानकर यांना मताधिक्य मिळाले होते. लोकसभेच्या वेळीही गावातील 80 टक्के मते भाजपच्या विरोधात होती.

 

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube