पंकजा मुंडे मुख्यमंत्री?, पवारांच्या पक्षातही भाकरी फिरणार; रोहित पवार नेमकं काय म्हणाले….
Rohit Pawar : विधानसभेला महायुतीचा (Mahayuti) मोठं यश मिळालं. त्यामुळं राज्यात महायुतीचे सरकार स्थापन येणार हे स्पष्ट झालं. शपथविधीला तीन दिवस बाकी आहेत. मात्र अद्याप मुख्यमंत्री कोण होणार? याची घोषणा अद्याप झालेली नाही. अशातच आता शरद पवार (Sharad Pawar) गटाचे आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) पंकजा मुंडेंना (Pankaja Munde) मुख्यमंत्रीपद दिलं जाईल, असं विधान केलं. ते सोमवारी पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.
मी शिंदेंना सांगत होतो तुमची कोंडी करण्याचा प्रयत्न होईल; बच्चू कडू
पत्रकार परिषदेत बोलताना रोहित पवारांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. मुख्यमंत्रिपदाविषयी बोलतांना ते म्हणाले की, मुख्यमंत्रिपदासाठी पंकजा मुंडेंचं नाव चर्चेत आहे. त्यामुळं भाजपकडून मुख्यमंत्रिपद पंकजा मुंडे यांना देण्यात येईल. त्या लोकनेत्या आहेत. ओबीसी समाज त्यांना मानतो. त्यामुळं त्यांना देखील संधी मिळू शकेल, त्यांना तर चांगली गोष्ट आहे, असं रोहित पवार म्हणाले.
शिंदे गटाने गृहमंत्रीपदाची मागणी केली. याविषयी बोलताना ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांना धोका लक्षात आलाय, त्यामुळेच ते गृहमंत्रीपद मागत आहे. अजित पवार यांच्या पक्षातून कोण मंत्री होणार हे त्यांनी ठरवलं पाहिजे. मात्र, भाजपच ते ठरवतांना दिसतेय. शिंदे आणि अजित पवार गटातील जे आमदार भाजपला फॉर आहेत त्या आमदारांना मंत्रिपद मिळेल, असं रोहित पवार म्हणाले.
‘लाडक्या बहिणींच्या’ मानधनात पुढल्या भाऊबीजेला वाढ?; मुनगंटीवारांचं मोठं विधान
यावेळी रोहित पवार यांनी अजित पवारांना टोला लगावला. आपल्या पक्षात कोणाला मंत्री करायचे हे ठरवण्याचा अधिकार त्या पक्षाच्या प्रमुखाला असतो. मात्र, या ठिकाणी सगळं भाजपचे दिल्लीतले नेते ठरवत आहेत. 2029 मध्ये शत प्रतिशत भाजपच्या दिशेने त्यांचा प्रवास सुरू आहे, असं रोहित पवार म्हणाले.
विधानसभा निवडणुकीत भाजपचा स्ट्राइक रेट 88.06 टक्के आहे. या निवडणुकीत भाजपला लाडक्या बहीण योजनेचा फायदा झाला. जिथे भाजपचे उमेदवार होते, तिथे 10 टक्के फायदा ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचं दिसत. ईव्हीएम सेट करण्यात आली होती, ईव्हीएममध्ये सेट केलं नसतं तर महाविकास आघाडीचे 126 आमदार निवडून आले असते, असं ते म्हणाले.
राष्ट्रवादीच्या पक्ष संघटनेत बदल करण्याची वेळ आली. शरद पवार आणि जयंत पाटील लवकरच बदल करतील, रोहित पाटील यांची मुख्य प्रतोदपदी नियुक्ती करण्याची शिफारस मीच केली होती, असंही रोहित पवार म्हणाले.शरद पवार गटात भाकरी फिरवण्याची शंभर टक्के वेळ आली आहे. माझ्यावर राज्य पातळीवरील जी जबाबदारी देतील ती मी स्वीकारणार असल्याचेही रोहित पवार यांनी सांगितले.