‘लाडक्या बहिणींच्या’ मानधनात पुढल्या भाऊबीजेला वाढ?; मुनगंटीवारांचं मोठं विधान
BJP Sudhir Mungantiwar On Ladki Bahin Yojna : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojna) महायुती सरकारने सुरू केली. त्याचबरोबर निवडणुकीच्या प्रचारामध्ये महायुतीच्या नेत्यांनी या योजनेच्या रकमेत बदल करून 2100 रूपयांचा हप्ता दिला जाईल, असं आश्वासन दिला. निवडणुकीत लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली. महिला मतदारांचं महायुतीच्या पारड्यात झुकतं माप होतं. त्यानंतर आता सर्व महिलांच्या मनात लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा सुधारित हप्ता कधी मिळणार? हा प्रश्न आहे. यावर आता भाजपचे जेष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांचं वक्तव्य समोर आलंय.
राज्यात 5 डिसेंबर रोजी नवं सरकार स्थापन होत आहे. लाडकी बहीण योजनेचा हप्ता 2100 रूपये केव्हापासून होणार? यावर आता सुधीर मुनगंटीवार यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट (Maharashtra Politics) केलंय. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देणार हे आश्वासन निवडणुकीच्यावेळी देण्यात आले होते. ते आश्वासन आम्ही पूर्ण करणार असल्याचं मुनगंटीवार म्हणाले आहेत.
भाजपा युतीकडून तरुणांच्या स्वप्नांवर नांगर फिरवण्याचे काम, कंत्राटी भरतीवरून पटोलेंचा हल्लाबोल…
सुधीर मुनगंटीवार या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र देखील लिहिणार आहेत. आम्ही आश्वासन धूळीस मिळू देणार नाही. अन्यथा आमची संपूर्ण देशात प्रतिमा खराब होईल, असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. मी महायुतीच्या जाहीरनामा समितीचा अध्यक्ष होतो, असं देखील मुनगंटीवार म्हणाले आहेत. जानेवारी की जुलै? नेमक्या कोणत्या महिन्यापासून योजनेचा हप्त्यात वाढ करून 2100 रूपये द्यायचे, यासंदर्भात चर्चा सुरू आहे. यावर सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, मागील वर्षी भाऊबीजेच्या दिवशी आम्ही ही योजना सुरू केली होती. त्यामुळे पुढील वर्षी या योजनेच्या रकमेत वाढ होवू शकते, असे संकेत देखील त्यांच्याकडून मिळाले आहेत.
लक्झरी कार, चित्रपटांसाठी भरघोस फी, विक्रांत मॅसीची नेट वर्थ जाणून व्हाल थक्क
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारदरम्यान, महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जनतेला वारेमाप आश्वासन देण्यात आली होती. महाविकास आघाडीने लाडकी बहीण योजनेची रक्कम तीन हजार रुपये करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याशिवाय त्यांनी योजनेचं नाव महालक्षी योजना करणार असं देखील सांगितलं होतं. तर महायुतीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमचं सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ करून 1500 वरुन 2100 करु, असे आश्वासन दिलं होतं. दरम्यान, आता वाढीव रक्कम देण्यासंदर्भात भाजपचे जेष्ठ नाते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी संकेत दिले आहेत.
लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी वाढणार? यावर सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, हा निर्णय मंत्रिमंडळाचा असतो. पुढील वर्षी निश्चितपणे योजनेच्या हप्त्यात वाढ होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला आहे. योजनेची रक्कम 2100 रूपये करण्याचं आश्वासन भाजपच्या संकल्पपत्रामध्ये आहे. हा राजा हरिश्चंद्राचा देश आहे. ‘रघुकल रीत सदा चले आये, प्राण जाये पर वचन न जाए’ असं देखील सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय.