महायुतीत जागावाटपाचा तिढा सुटेना…, ‘मोर्शी’ मध्ये मैत्रीपूर्ण लढत की अजितदादांची माघार?

  • Written By: Published:
महायुतीत जागावाटपाचा तिढा सुटेना…, ‘मोर्शी’ मध्ये मैत्रीपूर्ण लढत की अजितदादांची माघार?

Warud Morshi Constituency : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. महविकास आघाडी (MVA) आणि महायुतीकडून (Mahayuti) इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात येत आहे. तर दुसरीकडे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काही जागांवरून जागावाटपाचा तिढा आतापर्यंत सुटलेला नाही त्यामुळे या जगावर मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. यातच वरुड मोर्शी विधानसभा मतदारसंघात (Warud Morshi Constituency) महायुतीतील घटक पक्ष भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार दिल्याने या मतदारसंघात देखील मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या विधानसभा मतदारसंघात भाजपकडून (BJP) उमेश यावलकर (Umesh Yawalkar) आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. देवेंद्र भुयार या मतदारसंघात विद्यमान आमदार असून त्यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे आणि आज त्यांनी उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे. तसेच पक्षाकडून एबी फॉर्म मिळाल्याचा दावा देखील त्यांच्याकडून करण्यात येत आहे.

तर दुसरीकडे भाजपमध्ये काहीही दिवसापूर्वी प्रवेश करणारे उमेश यावलकर यांनी देखील भाजपकडून एबी फॉर्म मिळाला असल्याचा दावा केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांच्या उपस्थितीत त्यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे आता या मतदारसंघात महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार की भाजप किंवा अजित पवार माघार घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

भाजपची तिसरी यादी जाहीर, फडणवीसांचे PA सुमित वानखेडे निवडणुकीच्या रिंगणात

भाजपने आतापर्यंत विधानसभा निवडणुकीसाठी 145 उमेदवारांची घोषणा केली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत 50 पेक्षा जास्त उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपने पहिल्या यादीमध्ये 99, दुसऱ्या यादीमध्ये 21 आणि तिसऱ्या यादीमध्ये 25 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. राज्यात 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार असून 23 नोव्हेंबर रोजी मत मोजणी होणार आहे. यावेळी राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मुख्य लढत पाहायला मिळत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube