भाजपची तिसरी यादी जाहीर, फडणवीसांचे PA सुमित वानखेडे निवडणुकीच्या रिंगणात

  • Written By: Published:
भाजपची तिसरी यादी जाहीर, फडणवीसांचे PA सुमित वानखेडे निवडणुकीच्या रिंगणात

BJP Third List Announced  : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (BJP) आपली तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये भाजपने 25 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे पीए सुमित वानखेडे यांना देखील भाजपने आर्वी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे.

भाजपने आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांना देखील पुन्हा एकदा संधी दिली आहे. त्यामुळे आष्टी विधानसभा मतदारसंघात सुरेश धस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) मेहेबूब शेख यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे.

तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) विरोधात भाजपने साकोली मतदारसंघात अविनाश ब्राह्मणकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर भारती लवेकर यांना वर्सोवा मतदार संघातून पुन्हा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याच बरोबर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख यांच्या विरोधात भाजपकडून कटोल विधानसभा मतदारसंघातून चरणसिंग बाबुलाल ठाकुर यांना संधी देण्यात आली आहे. तर माळशिरसमध्ये राम सातपुते आणि शरद पवार गटाचे उत्तम जानकर यांच्यात लढत होणार आहे.

तर मूर्तिजापूरमधून हरिश पिंपळे, कारंजामधून सई डहाके, तिवसामधून राजेश वानखडे, मोर्शीमधून उमेश यावलकर, सावनेरमधून आशीष देशमुख, नागपूर मध्यमधून प्रवीण दटके, नागपूर पश्चिममधून सुधाकर कोहले, नागपूर उत्तरमधून मिलिंद माने, चंद्रपूरमधून किशोर जोरगेवार, उमरखेडमधून किसन वानखेडे, देगलूरमधून जितेश अंतापूरकर, डहाणूमधून विनोद मेढा, वसईमधून स्नेहा डुबे, वर्सोवामधून डॉ. भारती लव्हेकर, घाटकोपर पूर्वमधून पराग शाह, लातूर शहर अर्चना चाकूरकर, कराड उत्तरमधून मनोज घोरपडे, पलूस-कडेगावमधून संग्राम देशमुख यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

विधानसभेत रंगणार गुरू शिष्याची लढाई, मुंब्रात नजीम मुल्ला देणार जितेंद्र आव्हाडांना आव्हान

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत भाजपकडून 145 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपने पहिल्या यादीमध्ये 99, दुसऱ्या यादीमध्ये 21 आणि तिसऱ्या यादीमध्ये 25  उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.

भाजपाची तिसरी यादी

मूर्तिजापूर-हरिश पिंपळे

कारंजा-सई डहाके

तिवसा-राजेश वानखडे

मोर्शी-उमेश यावलकर

आर्वी-सुमीत वानखेडे

कटोल-चरणसिंग ठाकूर

सावनेर-आशीष देशमुख

नागपूर मध्य-प्रवीण दटके

नागपूर पश्चिम-सुधाकर कोहले

नागपूर उत्तर-मिलिंद माने

साकोली-अविनाश ब्राह्मणकर

चंद्रपूर-किशोर जोरगेवार

आर्णी-राजू तोडसाम

उमरखेड-किसन वानखेडे

देगलूर-जितेश अंतापूरकर

डहाणू-विनोद मेढा

वसई-स्नेहा डुबे

वर्सोवा-डॉ. भारती लव्हेकर

घाटकोपर पूर्व-पराग शाह

आष्टी-सुरेश धस

लातूर शहर-अर्चना चाकूरकर

माळशिरस-राम सातपुते

कराड उत्तर-मनोज घोरपडे

पलूस-कडेगाव-संग्राम देशमुख

follow us
  • fb
  • instagram
  • youtube