सस्पेन्स संपला! नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपचा शिलेदार ठरला ! काँग्रेस आमदाराचा भाऊच फोडला !

सस्पेन्स संपला! नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपचा शिलेदार ठरला ! काँग्रेस आमदाराचा भाऊच फोडला !

Nanded Lok Sabha by election BJP Candidate : राज्यात विधानसभा निवडणुकीबरोबर नांदेडमध्ये लोकसभा पोटनिवडणूक (Nanded Lok Sabha by election) जाहीर करण्यात आलीय. नांदेडमध्ये काँग्रेस पक्षाने स्व. खासदार वसंतराव चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांना तिकीट दिलंय. तर ‘एमआयएम’चे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी देखील नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत. भाजपने देखील आपला सस्पेन्स संपवला आहे. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र चव्हाण यांच्याविरोधात भाजपने (BJP) आपला शिलेदार रिंगणात उतरवला आहे.

‘भोर’मध्ये महाविकास आघाडीला मोठा फटका; शंकर मांडेकर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार

भाजपने नांदेड लोकसभा पोटनिवडणूक काँग्रेसचे रवींद्र चव्हाण यांच्याविरोधात डॉ. संतुक मारोतराव बेहर्डे (Santuk Beherde) यांना उमेदवारी दिलीय. जलील यांच्या उमेदवारामुळे भाजप उमेदवारास फायदा होण्याची शक्यता वर्तविली जातेय. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वसंतराव चव्हाण यांनी भाजपच्या प्रतापराव चिखलीकरांचा पराभव केला होता. परंतु लोकसभा निकालानंतर केवळ तीनच महिन्यांत वसंतराव चव्हाण यांचं निधन झालंय. त्यामुळे नांदेडमध्ये लोकसभा पोटनिवडणूक होत आहे.

मनीषा कोइरालाने केली कॅन्सरवर मात; ‘द प्रिन्सेस ऑफ वेल्स’ने दिल्या शुभेच्छा, पत्रात म्हणाली…,

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचे भाजप उमेदवार (BJP Candidate) भाजपा नांदेड दक्षिण ग्रामीण जिल्हाध्यक्ष आहेत. संतुक हंबर्डे नांदेड दक्षिण मतदारसंघाचे काँग्रेस आमदार मोहन हंबर्डे यांचे सख्खे भाऊ आहेत. आता नांदेड लोकसभेत मतदार राजा कुणाच्या बाजूने कौल देतो, हे पाहणे महत्वाचे आहे. आता संतुक हंबर्डे आणि रवींद्र चव्हाण यांच्यात लढत होणार आहे. त्यामुळे आता नांदेडकर पुन्हा दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या मुलाची साथ देणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.

खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे नांदेड लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसोबतच 20 नोव्हेंबर रोजी नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केलीय. त्यापाठोपाठ ‘एमआयएम’ कडून इम्तियाज जलील हे देखील मैदानात उतरणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube