राज्याला लवकरच एक उमदा नेता मिळणार…राहुरीत तनपुरेंनी फोडला प्रचाराचा नारळ; भाच्यासाठी मामा मैदानात

राज्याला लवकरच एक उमदा नेता मिळणार…राहुरीत तनपुरेंनी फोडला प्रचाराचा नारळ; भाच्यासाठी मामा मैदानात

Prajakt Tanpure filed candidature Rahuri : राहुरी (Rahuri) विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने शरद पवार गटाचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांना ( Prajakt Tanpure) मैदानात उतरवलं आहे. सध्या विधानसभा मतदारसंघावर शरद पवार गटाची (NCP) सत्ता आहे. प्राजक्त तनपुरे हे विद्यमान असून ते जयंत पाटील यांचे भाचे आहेत. आज प्राजक्त तनपुरे यांनी तुतारी चिन्हावर उमेदवारी अर्ज भरला आहे. राहुरीत मोठं शक्तिप्रदर्शन करत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलंय. यावेळी भाच्यासाठी मामा ( Jayant Patil) देखील मैदानात उतरले आहेत.

प्राजक्त तनपुरे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. आज सर्वांनी जो उत्साह दाखवला, सभेच्या ठिकाणी आलो. हे पाहता आपला विजय निश्चित आहे, यात शंका नाही, असं तनपुरे यांनी म्हटलंय. पुढचे 15-20 दिवस अविश्रांत परिश्रम घ्यायचे आहेत. लढाई जरी सोपी असली तरी, गाफील राहता कामा नये. गावोगावी जावून तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह सर्वांपर्यंत पोहोचवा. लोकसभेच्या वेळी गफलत झाली, तेव्हा 45 हजार मतं गेली त्यामुळे आता गफलत होता कामा नये, असं आवाहन प्राजक्त तनपुरे यांनी केलंय.

पाच वर्ष तुम्ही सर्वांनी मोठ्या प्रेमाने माझ्यावर विश्वास टाकला. यासाठी ऋणी आहे. आज पुन्हा मी जनतेच्या दरबारात आशिर्वाद मागण्यासाठी उभा आहे. केलेल्या विकासकामांवर विचार करून आपण पुन्हा एकदा मला संधी द्याल, अशी खात्री प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केलीय. मागील 10 वर्ष आणि आताचे 5 वर्ष याची पाण्यासंदर्भात तुलना करा, मगच मतदान करा असं आवाहन देखील त्यांनी केलंय. मागील दहा वर्ष आणि आताचे 5 वर्ष याची पाण्यासंदर्भात तुलना करा आणि मगच मतदान करा.

माझ्या चुकीची पुनरावृत्ती पवारांकडून, आता निर्णय…; अजितदादांनी दिले बारामतीच्या निकालाचे संकेत

राहुरी तालुक्यातल्या उत्तर भागातील लोकांना निळवंडे धरणाचे कायम आश्वासन दिली. 2009, 2014 आणि 2009 या तीन निवडणुकींत समोरच्या माणसांनी प्रचार केला, केवळ आश्वासनं दिली. परंतु मागच्या लोकप्रतिनिधींनी निळवंडे धरणाच्या कालव्यासाठी त्यांनी भरीव निधी दिलेला नाही, असं तनपुरे म्हणाले आहेत. दोन वर्षात निळवंडे धरणाचं पाणी आणल्याचं ते म्हणाले आहेत.

Video : चंद्रकांतदादांचं टेन्शन मिटलं; कोथरूडमधून बालवडकरांनी माघार घेत उचलला विजयाचा विडा

आज तनपुरे यांनी प्रचाराचा नारळ फोडलाय. यावेळी शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी जाहीर सभेला संबोधित केलंय. यावेळी जयंत पाटील म्हणाले की, प्राजक्तचे गुणे राज्यातील सर्व नेत्यांनी पाहिलंय. निळवंडे धरणाचं पाणी राहुरीत आणण्याचं काम केवळ प्राजक्तदादांनी केलंय. राज्याला लवकरच एक उमदा नेता मिळणार आहे. राज्यातील जनतेनं लोकसभेत कौल दिलाय की, यांना पाडायचं. तुमच्या सर्वांच्या आशिर्वादाने निलेश लंके खासदार झालेत. तुमच्या सगळ्यांच्या मतांचा करिष्मा म्हणून लंके दिल्लीला गेलेत. हाच आशिर्वाद तुम्ही एक नव्या कर्तबदार नेत्याला द्यावा. एक सरळ, सक्षम. सगळे प्रश्न सोडवणारा, कमी बोलणारा, जास्त मिळवणारा नसेल. पण तुमच्या सगळ्यांशी आज्ञाधारकपणाने वागणारा हा युवा नेता तुम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवा, अशी विनंती जयंत पाटलांनी केलीय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube