आज, उद्या अन् भविष्यातही आहे इथंच राहणार; नरहरी झिरवळांनी ठासूनच सांगितलं

आज, उद्या अन् भविष्यातही आहे इथंच राहणार; नरहरी झिरवळांनी ठासूनच सांगितलं

Narhari Zirwal News : मी आज उद्या अन् भविष्यातही आहे इथंच राहणार असल्याचं सांगत आमदार नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांनी दुसऱ्या पक्षात जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम देऊन टाकलायं. दरम्यान, नाशिकमधील सुरगाण्यात आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्यावतीने भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याला राष्ट्रवादीचे सर्वच दिग्गज नेतेमंडळींसह उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांच्यासमोरच नरहरी झिरवळ यांनी आहे तिथंच राहणार असल्याचं स्पष्ट केलंय.

विधानसभेलाही भाजप बॅकफूटवर? दोन आकडी जागांवरच यश मिळण्याचा अंतर्गत सर्व्हेत अंदाज

मागील काही दिवसांपासून नरहरी झिरवळ शरद पवार गटात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. नरहरी झिरवळ एका कार्यक्रमाला गेले असता शरद पवार गटाच्या नेत्याला नमस्कार घालत भेट घेतल्याचा फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. त्यावेळी झिरवळ शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली होती. अखेर खुद्द नरहरी झिरवळांनी यावर स्पष्टीकरण दिलं होतं. आता पुन्हा एकदा नरहरी झिरवळ यांनी त्या व्हायरल फोटोवरुन स्पष्टीकरण दिलं आहे.

नरहरी झिरवळ म्हणाले, कोणीही येईल काहीही उलट-पालटं सांगतील पण मी माध्यमांना सांगतो की, तुम्हाला थोडंस् मटेरियल काहीही कमी पडलं मटेरियल तर माध्यमांनी कधीही माझ्याकडे यावं, मी तुम्हाला उपलब्ध करुन देणार असल्याचं झिरवळांनी स्पष्ट केलंय. तसेच काही दिवसांपूर्वी मी तिथं मंदिरात पूजा होती तेव्हा नमस्कार घालताना एकाने फोटो काढून व्हायरल केला की लगेच शरद पवारांच्या गटात गेले अशा बातम्या आल्या. तेव्हापासून मला वाटायला लागलं की चांगल काही केलं तर नाव नाही येत असं काही केलं की लगेच नाव येतं, पण मी आहे तिथंच आज उद्या अन् भविष्यात राहणार असल्याचं झिरवळांनी ठासून सांगितलंय.

ईडी राहुल गांधींवर कारवाई करणार? राहुल गांधी म्हणाले, “स्वागतासाठी मी तयार..”

तसेच आाताही पाच सहा दिवस झाले, झिरवळांचा मुलगा शरद पवारांच्या गटात गेल्याचं सांगितलं जात आहे. पण माझा मुलगा दादांनी दिलेल्या फ्लॅटमध्ये मुंबईला चार दिवसांपासून मुक्कामी आहे..तो मुलगा माझा आहे ना..त्याला व्हायचं असेल आमदार तर मी थांबून घेऊन दादांना सांगेन की दादा त्याला करा आमदार, पण विरोधकांना घराघरात लावून द्यायची. तुम्ही काहीही करा माझ्या म्हातारीवर माझा विश्वास आहे, म्हातारीच्या पुढे कोणाचीच टप्पर नाही, असंही झिरवळांनी स्पष्ट केलंय.

अजितदादा म्हणजे फणस :
आपण आता सुज्ञ झालोयं कोणीही येऊन काहीही सांगतो, नंदी बैल येतो अन् सांगून जात असतो. अजितदादा म्हणजे फणस आहे.
वरुन काटे आतून गरे अन् गरेंच्यामध्ये बिया असतात, बियांचा सर्वांना उपयोग होतो उकडून खा नाहीतर कसंही खा..तशा आम्ही दादांसोबतच्या बिया आहोत असल्याचं नरहरी झिरवळांनी स्पष्ट केलंय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube