शरद पवार-अजित पवार एकत्र येतील; पण काही महत्वाकांक्षी नेत्यांना…सुनिल शेळकेंचा रोख कुणाकडं?

शरद पवार-अजित पवार एकत्र येतील; पण काही महत्वाकांक्षी नेत्यांना…सुनिल शेळकेंचा रोख कुणाकडं?

MLA Sunil Shelke : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी मोठ वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघं भविष्यात एकत्र आलं तर आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना मनापासून आनंद होईल. दरम्यान, ज्यांना स्वतःचं हित साध्य करायचं आहे, असे महत्वकांक्षी नेते ते असं होऊ देणार नाहीत, असा खळबळजनक वक्तव्य सुनील शेळके यांनी केलं आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

पवारांचं स्वागत  धोतर घातलेल्या शेतकऱ्याला हाकलून देणे नडले ! सरकारच्या दणकाने जीटी वर्ल्ड मॉल बंद

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार हे जुन्नरच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी आमदार बेनके यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्या नारायणगाव येथील घरी जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना यदाकदाचित विधानसभा निवडणुकीपूर्वी साहेब आणि दादा एकत्रही येऊ शकतात, असं विधान केलं होतं. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, शरद पवार हे आज जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. जुन्नरचे लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार अतुल बेनके हे पवारांचं स्वागत करण्यासाठी गेले होते. मात्र, त्यांच्यामध्ये राजकीय चर्चा झालेली नाही असंही शेळके म्हणाले.

बोलण्याचा रोख कुणाकडं ?

महाराष्ट्राच्या हितासाठी भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ होत असेल तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना नक्कीच त्याचा आनंद असेल. पण, काही महत्वकांक्षी मंडळींना स्वतःचं हित साध्य करायचं आहे. त्यांना महाराष्ट्रात लवकर नेते व्हायचं आहे, अशा मंडळी साहेब आणि दादांना किंवा ज्यांनी मागील ३५ ते ४० वर्षे साहेबांना साथ दिली, अशा नेतेमंडळींना एकत्र येऊ देणार नाहीत, हे देखील आम्हाला माहिती आहे, असंही आमदार शेळके यांनी स्पष्ट केलं. अशा बोलण्याचा नेमक शेळके यांचा रोख कुणाकडे होता याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मात्र, त्यांनी कुणाचं नाव घेतलं नसल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

आम्ही अजित दादांसोबतच गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वेच्या 202 गाड्या सोडणार, या तारखेपासून होणार बुकिंग सुरू

जे अजितदादांवर टीका टिप्पणी करतात. दादांचं पक्ष उभारणीतील आणि महाराष्ट्राच्या विकासात जे योगदान आहे. हे कुठेतरी झाकून आम्हीच पक्ष मोठा केला आहे. आम्ही पवारसाहेबांचे खरे वारसदार आहोत, असं दाखवण्याचं काम सुरू केलं आहे. त्या मंडळींना साहेबांसोबत दादांना किंवा ज्या मंडळींनी साहेबांसोबत काम केलं आहे. त्यांना एकत्र येऊ द्यायचं नाही असा मोठा आरोपही आमदार शेळके यांनी केला आहे. राजकारणात जे काही होईल ते होईल. पण माझ्यासारखा कार्यकर्ता अजितदादांना कधीही सोडणार नाही. अजितदादांची साथ अविरतपणे ठेवून त्यांच्यासोबत खंबीरपणं उभं राहणार, अशी माझी स्पष्ट भूमिका आहे, असंही शेळके यांनी यावेळी स्पष्ट केलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube