Sunil Shelke : ‘…तेव्हा भाजपसोबत जाण्यास रोहित पवार तयार होते’; अजितदादा गटाच्या आमदाराचा गौप्यस्फोट

Sunil Shelke : ‘…तेव्हा भाजपसोबत जाण्यास रोहित पवार तयार होते’; अजितदादा गटाच्या आमदाराचा गौप्यस्फोट

Sunil Shelke On Rohit Pawar : राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटामध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपाचं सत्र सुरु आहे. एकीकडे शरद पवार(Sharad Pawar) गटाचे आमदार रोहित पवार(Rohit Pawar) यांनी अजित पवार गटावर(Ajit Pawar Group) ब्लॅकमेलिंगचा आरोप केल्याचं पाहायला मिळतंय. तर दुसरीकडे अजित गटाच्या आमदारांकडूनही रोहित पवारांना(Rohit Pawar) जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

Parineeti Raghav Wedding: परिणीती राघवच्या लग्नासाठी चोख बंदोबस्त; पाहुण्यांसाठी फोनवर…

अजित पवार गटाकडून ब्लॅकमेलिंग केली जात असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केलायं, त्यावर आता राष्ट्रवादी अजित पवार गटा आमदार सुनिल शेळके यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर दुसऱ्याचं दिवशी अजित पवारांनी सगळ्यांना बोलावून घेतलं. त्यावेळी बैठकीत मतदारसंघाची कामं करायचे असतील, तर आपल्याला सत्तेत राहिल्याशिवाय पर्याय नाही. याच बैठकीत ही सर्व चर्चा होत असताना रोहित पवारांनी त्यात आग्रही भूमिका घेतली होती. जर भाजप सत्तास्थापन करत असेल, तर आपण भाजपमध्ये सामील होऊया, अशी रोहित पवारांनी भूमिका घेतली असल्याचा गौप्यस्फोट सुनिल शेळकेंनी केला आहे.

Dhangar Reservation चा निर्णय होईपर्यंत समाजाला आदीवासींच्या योजना लागू होणार; मुख्यमंत्र्यांचा दिलासा

तसेच राष्ट्रवादी पक्ष हा फक्त पक्ष नसून तो एक परिवार आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून आमच्यावर अनेक आरोप केले जात आहेत. दोन महिने आम्ही सगळे आरोप ऐकत आहोत. राष्ट्रवादी हा परिवार आहे. त्यामुळे परिवारासारखं राहिलं पाहिजे. शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार घेत शरद पवार आणि अजित पवार आपापल्या पद्धतीने काम करत आहेत. सगळ्यांना न्याय कसा मिळेल, याचा विचार करून त्यासाठी प्रयत्न करत असल्याचंही ते म्हणाले आहेत.

Women’s Reservation : 27 वर्षांची प्रतीक्षा संपणार; लोकसभेनंतर राज्यसभेतही ‘महिला आरक्षण विधेयक’ मंजूर होणार?

दरम्यान, अजित पवार गट सत्तेत गेल्यावर रोहित पवार शरद पवारांच्या अधिक जवळ जाऊ पाहत आहेत. पण पवारसाहेबांच्या जवळचे दादा हे फक्त अजितदादाचं असू शकतात. अन्य कोणत्याही दादांना ते जमणार नाही, असं म्हणत रोहित पवार हे अजितदादांची जागा घेऊ पाहत असल्याचाही गौप्यस्फोट शेळेकेंनी केला.

सुनिल शेळकेंच्या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात वेगळ्या चर्चांना ऊत आला आहे. सुनिल शेळके यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर रोहित पवार नेमकी काय भूमिका मांडणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube