पक्षनिष्ठेचं फळ! राजन पाटलांवर राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी

पक्षनिष्ठेचं फळ! राजन पाटलांवर राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी

Rajan Patil : मोहोळ मतदारसंघावर तीन वर्ष आपलं अस्तित्व टिकवून ठेवणारे माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांना पक्षनिष्ठेचं फळ मिळालंय. राजन पाटील यांच्यावर राज्य सहकारी परिषदेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आलीयं. प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या शब्दानूसार राजन पाटील यांची राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेल्या सहकारी परिषदेवर नियुक्ती झालीयं.

Video: विरोधकांना राजकारण कशाचं कराव याचं भान नाही; मेट्रो उद्घाटनावरून मोहळांचा विरोधकांवर वार

1995 सालापासून ते 2004 पर्यंत राजन पाटील मोहोळ मतदारसंघातून विधानसभेवर गेले आहेत. 1995 साली पहिल्यांदा ते काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले. त्यानंतर ते शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जात होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर त्यांनी शऱद पवार यांची साथ दिली. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर त्यांनी राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडणूका लढवल्या. मात्र, 2004 च्या पुर्नरचनेत मोहोळ मतदारसंघ राखीव झाला. त्यामुळे त्यांच्या कारकिर्दीला ब्रेक लागल्याचं दिसून आलं.

एखाद्याने हल्ला केल्यावर टाळ्या वाजवत बसणार का?, बदलापूर एन्काउंटरवर फडणवीसांचं रोखठोक मत

दरम्यान, 2004 सालानंतर कारकिर्दीला ब्रेक लागलेला असताना पाटील यांनी पक्षावरची निष्ठा कमी झाली नाही. राखीव मतदारसंघ झाला तरीही पाटील यांनी मोहोळ मतदारसंघावर आपलं अस्तित्व कायम ठेवलं. त्यांनी 2004 ते 2019 पर्यंत मोहोळातून राष्ट्रवादीचाच उमेदवार निवडून आणला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube