मानकर, ठोंबरेंच्या विरोधाला केराची टोपली; चाकणकरांच्या पाठीशी अजितदादा खंबीर उभे…

मानकर, ठोंबरेंच्या विरोधाला केराची टोपली; चाकणकरांच्या पाठीशी अजितदादा खंबीर उभे…

Ajit Pawar Twitt Rupali Chakankar : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या आणि महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्या मागे सदैव भक्कम उभा असल्याचं ट्विट खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलंय. अजितदादांचं हे ट्विट चांगलच चर्चेत आलंय, कारण काही दिवसांपूर्वीच शहराध्यक्ष दीपक मानकर आणि रुपाली ठोंबरे पाटील यांनी रुपाली चाकणकरांच्या नावाला विरोध दर्शवला होता, त्यानंतर आता अजित पवार यांनी हे ट्विट केलंय. अजितदादांनी ट्विट करत मानकर, ठोंबरे यांच्या विरोधाला एक प्रकारे टोपलीच दाखवल्याचं बोललं जात आहे.

अजितदादांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रुपाली चाकणकर यांनी पुण्यात केलेल्या आंदोलनाबाबत माहिती देत असून या आंदोलनाप्रकरणी अजितदादांनी केलेल्या मदतीसंदर्भात सांगत आहेत. राज्यातील प्रत्येक समाजघटकाला अजितदादा न्याय देणारे नेते असल्याचं म्हणत रुपाली चाकणकरांनी अजित पवार यांचं कौतूक केलंय.

काही दिवसांपूर्वीच राज्यपाल नियुक्त 7 आमदारांची वर्णी लागलीयं. यामध्ये अजित पवार गटाकडून छगन भुजबळ यांचे चिरंजीव पंकज भुजबळ आणि इद्रीस नायकवडी यांची वर्णी लागलीयं. राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये आपली वर्णी लागावी, अशी इच्छा अजितदादांच्या अनेक शिलेदारांची होती. त्यामध्ये दीपक मानकर, रुपाली ठोंबरे यांचं नाव चर्चेत होतं.

अमिताभ बच्चन यांनी 82 व्या वाढदिवशी स्वत:ला दिलं करोडोंचं गिफ्ट; खरेदी केली आलिशान BMW i7, फिचर्स एकदा वाचाच…

राज्यपाल नियुक्त सात आमदारांमध्ये तीन भाजप, दोन शिंदे गट आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन जणांना संधी मिळाली. या यादीत रुपाली चाकणकर यांचं नाव नव्हतं. विधानपरिषदेवर चाककरांना संधी मिळेल अशी चर्चा होती. परंतु, पक्षातूनच त्यांच्या नावाला विरोध झाला. एकाच व्यक्तीला सगळी पदं देणार का? असा थेट सवाल रुपाली ठोंबरे यांनी विचारला होता. त्यामुळे राज्यपालांना पाठवण्यात आलेल्या यादीत रुपाली चाकणकर यांचं नाव नव्हतं. तरी देखील महिला आयोगाच्या अध्यक्षपदी चाकणकर यांनाच कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

अजित पवार गट भाजपसोबत सत्तेत गेल्यानंतर अनेकांच्या नवीन नियुक्त्या केल्या जात आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदी दीपक मानकर यांची निवड प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली.

दरम्यान, रुपाली चाकणकरांना यांना पक्षातूनच होत असलेल्या विरोधाला केराची टोपली दाखवत अजित पवार यांनी रुपाली चाकणकरांचा एक व्हिडिओ शेअर करीत मी सदैव तुझ्या पाठीशी भक्कम असल्याचं ठणकावून सांगितलंय. या पोस्टमुळे पक्षात विरोध करणाऱ्यांना चपराक बसणार असल्याचं दिसून येत आहे. तर यावर आता चाकणकरांना विरोध करणारे काय भूमिका घेतली हे पाहणं महत्वाचं ठरेल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube