अमिताभ बच्चन यांनी 82 व्या वाढदिवशी स्वत:ला दिलं करोडोंचं गिफ्ट; खरेदी केली आलिशान BMW i7, फिचर्स एकदा वाचाच…
Amitabh Bachchan Birthday Gift : अभिनेते अमिताभ बच्चन सेडान(Amitabh Bachchan) यांनी नुकताच त्यांचा 82 वा वाढदिवस साजरा केलाय. केवळ त्यांचे कुटुंबीयच नाही, तर देशभरातील आणि जगभरातील चाहत्यांनी त्यांच्या खास दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. बिग बींना कारची आवड आहे. त्यामुळे या वाढदिवसानिमित्त त्यांनी स्वत:ला एक आलिशान इलेक्ट्रिक कार (Amitabh Bachchan) भेट दिलीय. आता त्यांच्या कलेक्शनमध्ये आणखी एक नवीन कार जोडली गेलीय. या कारची वैशिष्ट्ये आश्चर्यकारक आहेत. अमिताभ बच्चन यांनी नवीन इलेक्ट्रिक सेडान BMW i7 विकत घेतली आहे.
इलेक्ट्रिक सेडान BMW i7 ही सध्या सेलिब्रिटींची आवडती कार बनली आहे. अमिताभ बच्चन यांच्या आधी अजय देवगण, थलपथी विजय, जॅकलिन फर्नांडिस, किम शर्मा, रेखा, शेखर सुमन, (Bollywood News) झहीर इक्बाल आणि जयराम रवी या सेलिब्रिटींनीही ही आलिशान कार खरेदी केलीय. फार कमी लोकांना माहीत आहे की, बिग बींची पहिली कार सेकंडहँड होती . Fiat 1100 ही त्याची पहिली कार होती, जी त्यांनी सेकंड हँड खरेदी केली होती. ‘सात हिंदुस्तानी’ या पहिल्या चित्रपटाच्या यशानंतर त्यांनी ही गाडी विकत घेतली होती.
Amitabh Bachchan: बिग बीं यांनी शेअर केला शाळेतला ‘तो’ फोटो, तुम्ही पाहिलात का?
युट्युबवर Cars For You ने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, बच्चन वाढदिवसानिमित्त त्यांच्या नवीन कारसोबत दिसत आहेत. BMW i7 मध्ये 12.3-इंचाचा इन्फोटेनमेंट डिस्प्ले, 14.9-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि मागील सीटच्या प्रवाशांना स्वतंत्र 5.5-इंच टचस्क्रीनसह एक भव्य इंटीरियर देखील आहे. आत 31.3-इंच 8K थिएटर स्क्रीन आहे. ज्यामध्ये Amazon FireTV हार्डवायर्ड आहे; हे मागील बाजूस बसलेल्या प्रवाशांना सिनेमॅटिक अनुभव देते. ही इलेक्ट्रिक कार फक्त 4.7 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग घेते. सर्वात जास्त वेग 250 किमी प्रतितास आहे. BMW i7 195 kW DC चार्जिंगला सपोर्ट करते.
Amitabh Bachchan यांना यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार जाहीर! 24 एप्रिलला होणार खास सोहळा
बच्चन यांच्या नवीनतम कारच्या जोडणीने एक हेवा करण्याजोगा गाड्यांचा संग्रह तयार केलाय. यामध्ये रोल्स-रॉईस फँटम (रु. 3 कोटी), मर्सिडीज-बेंझ जीएल 63 AMG (रु. 2.12 कोटी), रेंज रोव्हर 4.4D AB LWB (रु. 3.76 कोटी), आणि एक पोर्श केमॅन यांचा समावेश आहे. त्यांच्या गॅरेजमध्ये बेंटले कॉन्टिनेंटल जीटी, लेक्सस एलएक्स 570 आणि लँड रोव्हर डिफेंडर देखील आहेत.