Amitabh Bachchan यांना यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार जाहीर! 24 एप्रिलला होणार खास सोहळा

Amitabh Bachchan यांना यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार जाहीर! 24 एप्रिलला होणार खास सोहळा

Amitabh Bachchan announces Lata Mangeshkar Award 2024 : यंदाचा “लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार” ( Lata Mangeshkar Award 2024 ) हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते महानायक अमिताभ बच्चन ( Amitabh Bachchan ) यांना जाहीर करण्यात आला आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृति प्रतिष्ठान ( Master Dinanath Mangeshkar Foundation ) ही विश्वस्त संस्था गेली 34 वर्षे दरवर्षी संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, पत्रकारीता वसामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांचा गौरव करते. यामध्ये 2022 पासून गान सम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ एक विशेष म्हणजे “लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार” प्रदान केला जातो. यंदाचे “लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार” आणि इतर पुरस्कार 24 एप्रिलला खास सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहेत.

Lok Sabha Election : .. तर ती माझी चूक आहे का? भर सभेत विशाल पाटलांच्या डोळ्यात अश्रू

यंदाचा हा मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा 82 वा स्मृतिदिन आहे. तर मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृति प्रतिष्ठान ही संस्था मंगेशकर कुटुंबियांनीच स्थापन केलेली आहे. त्याचा मुळ उद्देश हा आहे की, दरवर्षी संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, पत्रकारीता व सामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कार केला जावा.

UPSC 2023 टॉपर आदित्य श्रीवास्तवने आधी आयपीएस आता आयएएसला कशी घातली गवसणी?

आत्तापर्यंत सुमारे 212 व्यक्तींना गेल्या ३४ वर्षात हे पुरस्कार प्रदान केले आहेत. तसेच या दिवशी पुरस्कार सोहळ्यानंतर संगीत तथा नाट्य, नृत्य असे कलाक्षेत्रातील विविध कार्यक्रम केले जातात. तसेच 2022 वर्षापासून भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ एक विशेष म्हणजे “लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार” प्रदान करण्याचे सर्व विश्वस्तांनी ठरविले आहे. त्यानुसार 2022 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार प्रदान केला होता. 2023 आशा भोसले यांना हा पुरस्कार दिला होता.

हा पुरस्कार दरवर्षी फक्त एकाच अशा व्यक्तीला दिला जातो की ज्याने आपल्या राष्ट्रासाठी, लोकांसाठी आणि समाजासाठी अतुलनीय, नेत्रदीपक आणि अनुकरणीय योगदान दिले आहे. यंदाचा हा कार्यक्रम दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले (पु.), मुंबई येथे बुधवार 24 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 6.30 वा. असेल.

तर यंदाचे ८२ व्या पुण्यतिथी निमित्त दिले जाणारे इतर पुरस्कार पुढील प्रमाणे आहेत.
लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार – अमिताभ बच्चन,
मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार : अशोक सराफ (प्रदीर्घ नाट्य-चित्रपट सेवा),
मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार : पद्मिनी कोल्हापुरे (प्रदीर्घ चित्रपट सेवा),
मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार : रूपकुमार राठोड (प्रदीर्घ संगीत सेवा),
मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार : भाऊ तोरसेकर (प्रदीर्घ पत्रकारिता),
मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार : अतुल परचुरे (प्रदीर्घ नाट्य सेवा),
मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार : रणदीप हुडा (उत्कृष्ठ चित्रपट निर्मिती),
मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार : ए आर रेहमान ( प्रदीर्घ संगीत सेवा ) ,
मोहन वाघ उत्कृष्ट नाट्य निर्मिती पुरस्कार : गालिब नाटक
आशा भोसले पुरस्कृत आनंदमयी पुरस्कार : दीपस्तंभ फाऊंडेशन मनोबल (समजसेवेसाठीचा पुरस्कार)
वाग्विलासीनी प्रदीर्घ साहित्य सेवा पुरस्कार : मंजिरी फडके

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज