Lata Dinanath Mangeshkar Award : विद्या बालन पुरस्कार स्वीकारताना का झाली भावूक?

Lata Dinanath Mangeshkar Award : विद्या बालन पुरस्कार स्वीकारताना का झाली भावूक?

Vidya Balan : बॉलिवूड (Bollywood)अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan)हिला नुकताच षण्मुखानंद सभागृहात आयोजित लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने (Lata Dinanath Mangeshkar Award)सन्मानित करण्यात आले. आशा भोसले (Asha Bhosle)आणि लता मंगेशकर (Lata Mangeshkar)यांचे वडील दीनानाथ मंगेशकर (Dinanath Mangeshkar)यांच्या स्मृतीदिनानिमित्त हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात पुरस्कार स्वीकारताना अभिनेत्री विद्या बालन भावूक झाल्याच्या पाहायला मिळाल्या.

करोडोंचा चुराडा करणाऱ्या सरकारची हाव कमी होणार का ?; ‘त्या’ फर्मानावर तनपुरेंचा संताप

यावेळी विद्या बालन म्हणाली की, माझे भाग्य आहे की मला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ते एक प्रकारचे प्रोत्साहन आहे. पण आज मिळालेला पुरस्कार हा एक मोठा सन्मान असल्याचं वाटू लागलं आहे. आणि मला लताजींचे आशीर्वाद कायम मिळावेत अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली आहे.

विद्या बालन म्हणाली की, मी खूप भाग्यवान आहे कारण माझे आशाजींसोबत खूप प्रेमाचे नाते आहे. एकदा आम्ही मुंबई ते पॅरिस एकत्र प्रवास केला होता, अशीही एक आठवण विद्या बालनने सांगितली.

पुरस्कार स्वीकारताना आशा भोसले यांना त्यांच्या मोठ्या बहिणीची खूप आठवण आली. त्या म्हणाल्या की, मी येथे मंचावर उपस्थित असलेल्या सर्व लोकांना नमस्कार करू शकत नाही, मला आशीर्वाद द्यायला आवडेल, कारण माझे आशीर्वाद देण्याचे वय आहे. माझे वय 90 वर्षे आहे. माझा जन्म 1933 मध्ये झाला आणि मी फक्त 10 वर्षांची असताना 1943 पासून गात आहे. माझी एकच इच्छा आहे, की मी माझ्या बहिणीसाठी हा पुरस्कार घेत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube