सुनील टिंगरेंनी वडगाव शेरीचा सस्पेन्स संपवला; अजितदादा अन् पटेलांचा मला फोन

सुनील टिंगरेंनी वडगाव शेरीचा सस्पेन्स संपवला; अजितदादा अन् पटेलांचा मला फोन

Sunil Tingare News : राज्यात विधानसभा निवडणुकीची (Assembly Election) रणधुमाळी सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून (Ajit Pawar Group) उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आलीयं. या यादीमध्ये 38 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीयं. या यादीतून अनेक विद्यमान आमदारांना वेटिंगवर ठेवण्यात आलं असून जाहीर यादीत पुण्यातील वडगाशेरी मतदारसंघातील विद्यमान आमदार सुनिल टिंगरे(Sunil Tingare) यांचं नाव नाही. वडगावशेरीच्या उमेदवारीबाबत सस्पेन्स निर्माण झालायं. आता खुद्द आमदार सुनिल टिंगरे यांनी वडगाव शेरीचा सस्पेन्स संपलायं. उमेदवारांची ही पहिली यादी अंतिम नसून मला अजितदादांनी एबी फॉर्म दिलायं, त्यामुळे मी निवडणूक लढवणार असल्याचं आमदार सुनिल टिंगरेंनी स्पष्ट केलंय. विशेष म्हणजे खुद्द अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांचा मला फोन आला असल्याचा दावाही सुनिल टिंगरे यांनी केलायं.

राष्ट्रवादी अजित पवारांकडून पहिली यादी जाहीर; राजकारणातून निवृत्ती घेतलेल्या आमदाराला उमेदवारी

राष्ट्रवादीच्या उमदेवारांची यादी जाहीर झाल्यानंतर सुनिल टिंगरे यांनी माध्यमांशी संवाद साधलायं. यावेळी बोलताना आमदार टिंगरे म्हणाले, ही पहिली यादी आहे अंतिम नाही, मला अजित पवार सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल या सर्व नेत्यांनी फोन केलायं. मला अजित पवारांनी एबी फॉर्म दिलाय. मी निवडणूक लढणार आहे. वडगावशेरी मतदारसंघातील जनतेला काम करणारा उमेदवार हवायं, मी 1510 कोटींचा निधी मतदारसंघाच्या विकासासाठी आणलायं, त्यामुळे सध्या जे काही सुरु आहे त्याला जनता भीक घालणार नसल्याचा दावा सुनिल टिंगरे यांनी केलायं.

मोठी बातमी : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला मुंबई HC कडून जामीन; जन्मठेपेलाही स्थगिती

दुसऱ्या पक्षाला जागा देण्याचा प्रश्नच नाही…
ज्या मतदारसंघात ज्या पक्षाचा विद्यमान आमदार त्याच आमदाराला तिकीट देणार येईल, असं ठरलेलं आहे. त्यामुळे विद्यमान आमदाराची जागा ठरलेली असताना दुसऱ्या पक्षाला जागा देण्याचा प्रश्नच येत नाही, असंही आमदार टिंगरे यांनी स्पष्ट केलंय.

तसेच माझ्यासमोर कोण व्यक्ती आहे कोणता पक्ष आहे हे कधी पाहत नाही. मी फक्त विकासावर निवडणूक लढवतो कोणी कितीही आरोप करो काहीही फरक पडत नाही. मी जेवढा निधी आणलायं, त्यापेक्षा अधिक निधी कोणी आणला असेल तर मला दाखवा. लोकांनी जे काही चुकीचं मांडलंय त्याने काहीही फरक पडत नाही मी कसा ते कसे हे जनतेला सगळं माहिती असल्याचंही टिंगरेंनी स्पष्ट केलंय.

दरम्यान, शरद पवार यांच्याबद्दल कायम आदर आहे, शरद पवार आमचे आदरणीय असून त्यांना माझा कान पकडण्याचा अधिकार आहे, त्यांनी जाहीर सभेत माझ्यावर टीका केलीयं, त्यांना माझ्यावर टीका करण्याचा अधिकार आहे, माझ्या तीन पिढ्यांनी त्यांच्यासोबत काम केलंय. मी त्यांच्यावर काही बोलू इच्छित नाही, असंही टिंगरे म्हणाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube