अधिवेशनानंतर अजित पवारांचा मोठा डाव; जयंत पाटलांच्या गडाला सुरुंग लावणार, कोण फुटणार?

अधिवेशनानंतर अजित पवारांचा मोठा डाव; जयंत पाटलांच्या गडाला सुरुंग लावणार, कोण फुटणार?

Nationalist Ajit Pawar Group : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी (Pawar) महायुती आणि महाविकास आघाडीतील तीनही पक्ष एकत्र असले तरी वेगळ लढण्याच्या तयारीला लागलेत. त्यातच आता अजित पवार पश्चिम महाराष्ट्रात पहिल डाव टाकताना दिसत आहेत.

सांगली जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दिग्गज नेत्यांचा पक्षप्रवेश आगामी काळात होणार असल्याची चर्चा आता रंगली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन अजित पवार गट आणि नाराज असलेल्या जिल्ह्यातील ४ माजी आमदारांनी एकत्रित येण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच हे ४ माजी आमदार अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत.

लाडकी बहीण योजनेमध्ये दुरुस्ती… अजित पवारांनी सभागृहात कोणती मोठी घोषणा केली?

विधिमंडळ अधिवेशनानंतर मोठमोठे पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे. तरी, त्यासंदर्भातच एक महत्वाची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या उपस्थितीत मिरजेतील शासकीय गेस्ट हाऊसमध्ये पार पडली. या बैठकीला विलासराव जगताप, अजित घोरपडे, राजेंद्र देशमुख आणि शिवाजीराव नाईक या चारही दिग्गजांनी उपस्थिती लावली होती.

त्यावेळी या नेत्यांमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटात पक्षप्रवेशाबाबत प्राथमिक चर्चादेखील झाल्याचं कळतंय. त्याचसोबत अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांशी चर्चा होऊन या सर्व माजी आमदारांचा पक्षप्रवेश होईल, असं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सांगण्यात येत आहे.

‘ते’ चार संभाव्य माजी आमदार कोण?

शिराळ्याचे माजी मंत्री शिवाजीराव नाईक

जतचे माजी आमदार विलासराव जगताप

कवठेमहांकाळचे माजी मंत्री अजित घोरपडे

आटपाडीचे माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख

follow us
  • fb
  • instagram
  • youtube