सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ द्या…संसदेत आंदोलन, निलेश लंकेंसह महाविकास आघाडीचे नेते आक्रमक

सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ द्या…संसदेत आंदोलन, निलेश लंकेंसह महाविकास आघाडीचे नेते आक्रमक

Nilesh Lanke Protest In Parliament For Farmers : खासदार निलेश लंके यांनी (MP Nilesh Lanke) सोयबीन खरेदीवाढी मुदतवाढ मिळावी, या मागणीसाठी संसदेत (Parliament) आंदोलन केलंय. यावेळी महाविकास आघाडीचे इतर खासदार देखील उपस्थित होते. मागील आठवड्यात खासदार निलेश लंके यांनी लोकसभेत सोयाबीन (soyabeans) खरेदी मुदतवाढीचा मुद्दा जोरदारपणे मांडला होता. त्यावेळी त्यांनी स्पष्ट इशारा दिला होता की, जर मुदतवाढ मिळाली नाही, तर आंदोलन छेडलं जाईल.

जरांगेंच्या आंदोलनाला वाळू माफियांचा सपोर्ट, माझ्या घरावर रेकी; लक्ष्मण हाकेंचे गंभीर आरोप

आज खासदार सुप्रिया सुळे, खासदार निलेश लंके, खासदार ओमराजे निंबाळकर आणि महाविकास आघाडीच्या इतर खासदारांनी संसद परिसरात आंदोलन (Nilesh Lanke Protest) केले. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी सरकारला जागे करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी हा संघर्ष सुरूच राहील, असं महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सांगण्यात आलंय.

महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकरी शासनाच्या वेळकाढूपणामुळे अडचणीत सापडला आहे. राज्यातील ‘नाफेड’च्या माध्यमातून सोयाबीन खरेदी केला जात आहे. यासाठी नोंदणी करुनही अनेक शेतकऱ्यांचा सोयाबीन खरेदी करण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी सोयाबीन खरेदीला मुदतवाढ आणि योग्य खरेदीमूल्य देण्याची आवश्यकता आहे.

कर्जतमध्ये रंगणार अजिंक्यपद महाराष्ट्र केसरीचा थरार! जिल्हा तालीम संघाच्या वतीने रोहित पवारांना पत्र

राज्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन शिल्लक आहे. मुदतवाढ मिळाली नाही, तर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे . शेतकऱ्यांचा हा आवाज शासनाच्या कानापर्यंत पोहोचविण्यासाठी महाविकास आघाडीच्या खासदारांनी संसदभवन परिसरात निदर्शने करुन घोषणा दिल्या. शासनाने याची दखल घेऊन तातडीने सोयाबीन खरेदीला मुदतवाढ आता योग्य तो भाव द्यावा, अशी मागणी खासदार निलेश लंके यांनी केली आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube