Nilesh Lanke ॲक्शन मोडमध्ये, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सत्ताधाऱ्यांना घेरणार, ‘या’ दिवशी जनआक्रोश मोर्चा काढणार

Nilesh Lanke ॲक्शन मोडमध्ये, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सत्ताधाऱ्यांना घेरणार, ‘या’ दिवशी जनआक्रोश मोर्चा काढणार

Nilesh Lanke : अहमदनगरचे खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार 5 जुलै रोजी महाविकास आघाडीच्या वतीने (MVA) निर्यातबंदीमुळे कांद्याचे कोसळलेले भाव आणि दुधाच्या दरात झालेल्या कपातीच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

माहितीनुसार, या आंदोलनाला शुक्रवार 05 जुलै रोजी सकाळी 10 वाजता सुरु होणार आहे. या आंदोलनात शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे. खासदार लंके यांनी या आंदोलनासंदर्भात जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांना निवेदन देखील दिला आहे.

त्यांनी या निवेदनात म्हटले आहे की, आज राज्यातील कांदा आणि दूध उत्पादक शेतकरी योग्य भाव न मिळण्याने मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. गेल्या वर्षभरापासून दुधाचे भाव कोसळत आहे. सध्या दुधाला मिळणाऱ्या भावामुळे शेतकऱ्यांचा खर्चही निघत नाही. सरकारकडून दुधाला अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे मात्र त्यावर लागू करण्यात आलेल्या अटी आणि शर्तींमुळे शेतकऱ्यांना त्याचा लाभ घेता येत नाही.

तर दुसरीकडे केंद्र सरकारने निर्णय घेत 10 हजार टन दूध पावडर आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. ही आयत करमुक्त असणार असल्याची घोषणा देखील सरकारने केली आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णयांचा मोठा फटका दूध उत्पादकांना बसणार आहे. असं त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

पुढे त्यांनी म्हटले आहे की, आज केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांना नुकसान होत आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे, अवकाळी पावसामुळे, नैसर्गिक आपत्ती, खतांचे वाढलेल्या दरांमुळे तसेच रासायनिक खते, बी-बियाणे, किटकनाशके, शेती औजारे यांच्या माध्यमातून जी. एस.टी. चा शेतकऱ्यांवर आर्थिक बोजा पडला आहे मात्र सरकार कोणतीही कारवाई करत नाही.

सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पूर्णपणे कर्जमाफीसह तात्काळ विविध उपाययोजना करणे आवष्यक आहे. असं देखील लंके यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच आज शेतकऱ्यांना दूध आणि शेतीमालाच्या हमी भावावरून प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे आज अनेक शेतकरी संघटना आंदोलने देखील करत आहे.

Nawab Malik : महायुतीमध्ये पुन्हा वाद? नवाब मालिकांची अजित पवार गटाच्या बैठकीला हजेरी

महाविकास आघाडीच्या वतीने शेतकऱ्यांना दुधाला 40 रुपये भाव मिळवा आणि तात्काळ संपूर्ण कर्ज माफी करण्यात यावी तसेच शेतीमालाला योग्य हमी भाव मिळावा या मागणीसाठी हजारो शेतकरी, दुध उत्पादक तसेच विविध शेतकरी संघटनांसह 05 जुलै सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती खासदार लंके यांनी निवेदनात दिली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube