कर्जतमध्ये रंगणार अजिंक्यपद महाराष्ट्र केसरीचा थरार! जिल्हा तालीम संघाच्या वतीने रोहित पवारांना पत्र

कर्जतमध्ये रंगणार अजिंक्यपद महाराष्ट्र केसरीचा थरार! जिल्हा तालीम संघाच्या वतीने रोहित पवारांना पत्र

Letter to Rohit Pawar From District Training Association of Maharashtra Kesari : अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्हा तालीम संघाच्या वतीने आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना कर्जत येथे 66 वी वरिष्ठ गादी आणि माती राज्यस्तरीय अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) कुस्ती स्पर्धा 2024-25 आयोजन करण्याबाबतचे पत्र देण्यात आले. आमदार रोहित पवार मित्र मंडळाच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन स्विकारण्यात आले आहे.

यावेळी जिल्हा तालीम संघाचे खजिनदार पैलवान नाना डोंगरे, नगर शहर तालीम संघाचे अध्यक्ष नामदेव लंगोटे, पाथर्डी तालुका तालीम संघाचे सचिव पप्पू शिरसाठ, शेवगाव तालुका तालीम संघाचे अध्यक्ष विक्रम बारवकर, पैलवान ऋषिकेश धांडे, पैलवान काका शेळके, मिठू धांडे, विजय मोढळे, आसिफ शेख हे उपस्थित होते.

अजितदादांनी आणलं बारामतीच्या दुष्काळी भागाला पाणी; दौंड, पुरंदर तालुक्यालाही फायदा

नगर जिल्हा तालीम संघाने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेकडे 2024-25 च्या 66 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धाच्या आयोजनाची मागणी केली होती. त्याला मान्यता मिळाली आहे. या स्पर्धेचे आयोजनाची जबाबदारी आमदार रोहित पवार यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. यावेळी बोलताना आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या आयोजनाबाबत अत्यंत दिमाखदार आणि योग्य पद्धतीने आयोजन करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.

हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, वस्ताद व पैलवानांचा योग्य मान-सन्मान करून ही स्पर्धा पार पडली जाणार आहे. कुस्ती स्पर्धेचे आयोजन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्वतोपरी मदत करू, असे ते म्हणाले. रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी यशस्वीपणे पार पडेल, अशी अपेक्षा तालीम संघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलीये.

ऑनलाइन सुरक्षा अन् जबाबदार डिजिटल वर्तनाबाबत जागरूकता निर्माण करायची; आयुष्मान खुराना

नुकतीच अहिल्यानगरमध्ये आमदार संग्राम जगताप यांनी आयोजित केलेली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली होती. मात्र ही स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यात वादंग निर्माण झाल्याचं समोर आलं होतं. दरम्यान पैलवा शिवराज राक्षे यांनी पंचाच्या छातीत लाथ मारली होती, त्यामुळे ही स्पर्धा आणखीनच चर्चेत आली होती.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube