लाडकी बहीण योजनेमध्ये दुरुस्ती… अजित पवारांनी सभागृहात कोणती मोठी घोषणा केली?

लाडकी बहीण योजनेमध्ये दुरुस्ती… अजित पवारांनी सभागृहात कोणती मोठी घोषणा केली?

Ajit Pawar Announcement On Ladki Bahin Yojana : विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ (Ladki Bahin Yojana) ही नेहमीच चर्चेत असते. लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. यासंदर्भात आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी एक महत्वाची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी विरोधकांच्या आरोपांनाही उत्तर दिलंय.

अजित पवार म्हणाले, लाडकी बहीण विरोधकांच्या मनातून काही जात नाहीये. लाडकी बहीण आमची झाल्यामुळे तुम्ही दोडके झाला आहात. या योजनेत दुरुस्ती करणार असल्याचं आज अजित पवारांनी ठामपणे सांगितलं आहे.

बिबट्यांना शोधण्यासाठी ड्रोनचा वापर करा; मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलच्या प्रशासनाला आदेश

अजित पवार म्हणाले की, लाडकी बहीण अर्थव्यवस्थेलाही चालना देणार आहे. त्यामुळे या योजनेचा वेगळा अर्थ मला सभागृहाला सांगायचा आहे. अर्थमंत्री म्हणून मी जेव्हा या योजनेकडे पाहतो, त्यावेळी यामधून राज्याच्या अर्थव्यवस्थेला भविष्यात काय मिळणार आहे, याचाही विचार करतो. 1500 रुपयांची थेट रोख रक्कम भगिनींना मिळते आहे. महिला सक्षमीकरणाचं एक मोठ पाऊल सरकारने उचललं.

परवाच विधान परिषदेत गटनेते प्रविण दरेकर यांनी केलेली एक घोषणा माझ्या वाचनात आली. लाडकी बहिण योजनेचं अकाऊंट उघडणाऱ्या भगिनींना त्यांची मुंबई बँक 10 ते 25 हजारापर्यंतची कर्ज देणार आहे. राज्यात महिला आर्थिक विकास महामंडळासारखी संस्था आहे, जिल्हा सहकारी बँका आहेत, सहकारी बँका आहेत. मी आपल्या सर्वांना एक नम्रतेचं आवाहन करणार आहे.

Video: धोनीलाही निमंत्रण दिलं होत पण तो… अश्विनचा मोठा खुलासा, CSK मध्ये परतण्या काय म्हणाला?

ज्या महिलांना छोटा, मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांच्यासाठी लाडकी बहिण योजना जोडून कर्ज योजना तुम्ही काढा. म्हणजे, ही योजना केवळ मदतीची राहणार नाही, तर त्यामधून महिलांचं सक्षमीकरण करण्याच्या बाबतीत आपण आणखी एक पाउल पुढे टाकू.

कारण, हा थोडाथडका पैसा नाही… सुमारे 45 हजार कोटी वर्षाला महिलांच्या हातात जाणार आहेत. या माध्यमातून ती बहीण सक्षम होईल, तिच्या कुटुंबाला हातभार लागेल. हा पैसा राज्याच्या अर्थव्यवस्थेत येऊन अर्थव्यवस्थेला छोटं, मोठं योगदान मिळेल, असं देखील अजित पवारांनी स्पष्ट केलंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube