चार्टर्ड प्लेन प्रकरण, अमित शाह – फडणवीस संतापले; जबाबदारीनं वागा म्हणत प्रसाद लाड, चित्रा वाघ, प्रवीण दरेकरांना दिला इशारा

Amit Shah On Chartered Plane : महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवशेन नागपूर येथे 8 डिसेंबरपासून सुरु असून 14 डिसेंबरपर्यंत चालणार आहे.

  • Written By: Published:
Amit Shah On Chartered Plane

Amit Shah On Chartered Plane : महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवशेन नागपूर येथे 8 डिसेंबरपासून सुरु असून 14 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनादरम्यान बेरोजगारी, शेतकरी आणि राज्यातील इतर मुद्द्यावरुन राज्य सरकारला प्रश्न विचारत आहे. तर दुसरीकडे या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजप नेते आणि आमदार प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, चित्रा वाघ आणि सुमीत वानखेडे यांनी चार्टर्ड प्लेनने अधिवेशनाला हजेरी लावली होती. तसेच चार्टर्ड प्लेनसह सेल्फी काढून सोशल मीडियावर पोस्ट केली होती.

देशात इंडिगोमुळे विमान प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असताना भाजप नेते चार्डर्ड प्लेनने प्रवाश करत असल्यामुळे विरोधकांनी जोरदार हल्लाबोल केला होता. तर आता या प्रकरणात केद्रींय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी दखल घेत आमदार प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, चित्रा वाघ आणि सुमीत वानखेडे यांना इशारा दिला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती समोर आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

देशातील सर्वात मोठी विमान सेवा देणारी कंपनी इंडिगो क्रू मेंबरच्या कमरतेमुळे आणि केंद्र सरकारच्या नवीन नियमांमुळे अडचणीत सापडली होती. ज्यामुळे राज्यासह देशातील विमानाने प्रवाश करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. त्याचवेळी हिवाळी अधिवेशनाला येण्यासाठी भाजप नेते आणि आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) , प्रवीण दरेकर (Praveen Darekar) , चित्रा वाघ (Chitra Wagh) , सुमीत वानखेडे (Sumit Wankhede) आणि भाजप माध्यमप्रमुख नवनाथ बन यांनी चार्टर्ड प्लेनने (Chartered Plane) प्रवास करत सेल्फी सोशल मीडियावर पोस्ट केली होती. यानंतर विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता. तर आता या प्रकरणात भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने दखल घेत या नेत्यांना इशारा दिला आहे.

भाजपाचे केंद्रीय संघटक बी. एस. संतोष आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यालयाने या प्रकरणात दखल घेत संबंधित नेत्यांना इशारा दिली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रसाद लाड, चित्रा वाघ आणि प्रवीण दरेकरांवर नाराजी व्यक्त केली आहे. जबाबदारीनं वागा, व्हायरल फोटोमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे आणि सोशल मीडियावर लोक नाराजी व्यक्त करत आहे असं संबंधित नेत्यांना सांगितले आहे.

स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीची भारतात एन्ट्री; GOAT India Tour ‘या’ 4 शहरांमध्ये करणार

तसेच पक्षातील नेत्यांनी शिस्तीचे पालन करायला हवे आणि संबेदनशीलतेने वागले पाहिजे असं देखील संबंधित नेत्यांना सांगितले आहे. तर पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम करणारे कोणतेही वर्तन खपवून घेतले जाणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संबधितांना सांगितले.

follow us