आमच्या आया रक्ताच्या थारोळ्यात पडल्या तेव्हा… फडणवीसांच्या आईबाबतच्या चित्रा वाघांच्या आरोपांवरून जरांगे भडकले

Manoj Jarange on Devendra Fadanvis : गेल्या कित्येक महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आरक्षणासाठी मुंबईमध्ये जाण्याची योजना आखली आहे. त्याअगोदर त्यांनी पत्रकार परिषद घेत फडणवीसांना 48 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. तसेच त्यांनी मुंबईत धडकण्याचा मार्गही सांगितला आहे. तसेच यावेळी त्यांनी फडणवीसांबाबत वापरेल्या अपशब्दांबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी चित्रा वाघांसह फडणवीसांवर देखील जोरदार हल्ला केला.
काय म्हणाले मनोज जरांगे?
मी देवेंद्र फडणवीसांच्या आईवरून काहीही बोललो नाही. मात्र तसे झाले असल्यास ते शब्द मी मागे घेतो. पण आरक्षण द्या. कारण आमच्याही आया-बहिणी रात्रंदिवस कष्ट करतात. त्यांचे मुलं फाशी घ्यायला लागले आहेत. तुमच्या आई प्रमाणे आमच्या आईला माना आणि आरक्षण द्या. तसेच मी मी देवेंद्र फडणवीसांच्या आईवरून काहीही बोललो नाही. मात्र तसे झाले असल्यास ते शब्द मी मागे घेतो. कारण आमचे मनं मोठे आहेत. तुमच्यासारखा आठमुठेपणा नाही.
पोलिसांना मारहाणीचे आदेश दिले. तेव्हा ती आमची आई नव्हती का? ती तेव्हा रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. कोण प्रवक्ता आहे. तो शेण खात आहे. कोण वाघीन आहे ती, तिला आमची आई नाही का दिसली. सरकारच्या शेळ्या कुठवर सांभाळती? माझ्या नादी लागू नको. आमच्या आया-बहिणींवर 360 चा गुन्हा दाखल झाला आहे. तुझ्यावर केला तर जमेल का? नाही तर मी तुझी सगळी माहिती काढेल. तुला आमदार खासदार व्हायचं असेल म्हणून तुला त्याच्या आईची माया येत असेल. असं म्हणत जरांगे यांनी चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे.
मद्यव्यवसायात राजकीय मेजवानी! 328 परवाने भाजप अन् राष्ट्रवादी नेत्यांच्या निकटवर्तीयांच्या खिशात
स्वत: च्या आईचं सोशल मिडीयावर टाकलं. आमच्या आईचं का नाही टाकलं की, हल्ला झाला म्हणून. तेव्हा महिलांनीच पोलिसांना मारल्याचा आरोप केला. पोलिस काय तुमचे आहेत का? नाटकं करतो. तुझी आई तुला प्रिय आहे. तर आमची आई आम्हाला प्रिय आहे. येत आहे मुंबईला. तु मुख्यमंत्री आहे तुला लाज वाटली पाहिजे. अशा भाषेत जरांगे यांनी फडणवीसांवर टीकास्त्र सोडलं आहे.