‘मराठ्यांना चुनाच लावायचे काम शरद पवारांनी केले पण चुना लावणारा माणूस…’, सदाभाऊ खोतांची टीका
Sadabhau Khot On Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीच्या (Mahayuti) बैठकीत रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी देखील हजेरी लावली होती. या बैठीकीनंतर माध्यमांशी बोलताना सदाभाऊ खोत यांनी बैठीकीबद्दल माहिती देत शरद पवार ( Sharad Pawar) यांच्यावर टीका केली आहे.
माध्यमांशी बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले, 60 वर्षांमध्ये मराठ्यांना चुनाच लावायचे काम शरद पवार यांनी केले आहे. पण चुना लावणारा माणूस यावेळी यशस्वी झाला ही गोष्ट निश्चितपणाने नाकारून चालणार नाही असं देखील सदाभाऊ खोत म्हणाले. याच बरोबर शरद पवार यांनी जरांगे पाटलांना लिहून द्यावं की त्यांचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातल्या मराठ्याला आम्ही 10 टक्के ओबीसीमध्ये आरक्षण देऊ असेही सदाभाऊ खोत म्हणाले.
तर देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीनंतर आम्ही सगळे एकत्रित बसून आज चर्चा केली. महायुतीला ज्या काही जागा कमी मिळाल्या त्याची जबाबदारी आमच्या सर्वांची आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले मला सरकारमधून मुक्त कराव पण निवडणुकीची सर्व जबाबदारी ही सर्वाची आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये राहावं. या महाराष्ट्राला विकासाच्या दृष्टीने घेऊन जाणारे नेतृत्व देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांच्या नेतृत्वाची गरज खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला आहे आणि महायुतीचे नेतृत्व सुद्धा येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांनी करावे असं सदाभाऊ खोत म्हणाले.
आम्ही महायुती सोबत कायम राहू
येणाऱ्या काळात देखील आम्ही महायुती सोबत कायम राहू अशी माहिती देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली. तसेच लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जनतेच्या मनामध्ये खऱ्या अर्थानं दूषित वातावरण निर्माण करण्याचं काम हे महाविकास आघाडीने महाराष्ट्रामध्ये केले आहे. असं ते म्हणाले.
जरांगे फॅक्टरचा सुद्धा तोटा महायुतीला झाला
तर लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा सुद्धा तोटा महायुतीला झाला अशी कबुली देखील त्यांनी यावेळी दिली. महाविकास आघाडीचे नेते शरद पवार आणि त्यांचा सगळा कंपू हे आता जरांगेला कामाला लावणार आहेत. मनोज जरांगे यांचा आंदोलन आता विधानसभा निवडणुकीपर्यंत चालेल. आरक्षणाचा वापर राजकीय पोळी भाजण्यासाठी शरद पवार करत आहेत असं म्हणत त्याची शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.
पुढे बोलताना ते म्हणाले, इंडिया आघाडी ही खऱ्या अर्थाने लुटारूंची टोळी आहे. ही टोळीवाल्यांची आघाडी आहे आणि म्हणून आम्ही एक इस्लामपूरला मेळावा घेतला. आमची लढाई भारत विरुद्ध इंडिया अशी आहे. भारतातली कष्ट करणारी जनता यांना घेऊन आम्ही लढत आहोत.
‘मराठा आरक्षणाचा फटका बसला’ अजित पवारांची कबुली
या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं अनेक बागुलबुवा निर्माण केले गेले आणि त्याचाही परिणाम या निवडणुकीवरती झाला याच बरोबर कांदा प्रश्नाचा फटका आणि दूध सोयाबीन याचा देखील फटका या निवडणुकीत बसला असल्याची कबुली त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.