‘मराठा आरक्षणाचा फटका बसला’ अजित पवारांची कबुली

‘मराठा आरक्षणाचा फटका बसला’ अजित पवारांची कबुली

Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी या लोकसभा निवडणुकीत आम्हाला मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) फटका बसला असल्याची कबुली दिली आहे. महायुतीचा (Mahayuti) घटक पक्ष म्हणून अजित पवार यांनी 5 लोकसभा जागांवर निवडणूक लढवली होती मात्र त्यापैकी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एकच जागा जिंकता आली. बारामतीत देखील अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचा सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याकडून पराभव झाला होता.

आज माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी आम्हाला या निवडणुकीत मराठा आरक्षणाचा फटका बसला असून यावेळी आमच्याकडून मुस्लिम समाज देखील दूर गेल्याची कबुली दिली आहे. तसेच बारामतीमध्ये झालेला पराभव मान्य करत बारामतीत मी कमी पडलो हे निर्विवाद सत्य आहे अशी जाहीर कबुली दिली.

आगामी विधानसभा निवडणुकीत ताकदीने लढू असं देखील अजित पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले. तसेच अजित पवार गटातील कोणताही आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात नसल्याची देखील त्यांनी यावेळी माहिती दिली.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची संपूर्ण जबाबदारी मी स्वीकारतो, आमच्यावरचा जनतेचा विश्वास कमी झाला असून तो पुन्हा मिळवण्यासाठी जीवाचं रान करु. निवडणुकीत माझ्या स्वतः मुळं हे अपयश आलेलं आहे. त्यामुळं यामध्ये दुसऱ्याला मला दोष द्यायचा नाही असं देखील अजित पवार म्हणाले.

राहुल गांधींना धक्का! ‘आप’ने सोडला काँग्रेसचा हात, केली मोठी घोषणा

follow us
  • fb
  • instagram
  • youtube