लोढांना केईएम नाव खुपलं थेट पालिकेलाच दिले नाव हटवण्याचे आदेश
रुग्णालयात मूलभूत सुविधांची हेळसांड होत असतांना नाव बदलण्यापेक्षा रुग्णसेवा सुधारण्याची गरज असल्याचे मागणी जोर धरतं आहे.
प्रतिनिधी, प्रशांत गोडसे
Is removing ‘Edward’ from KEM’s name a political drama for Lodhas? : मुंबई मधील परळ येथील केईएम (किंग एडवर्ड मेमोरियल) रुग्णालयाच्या शताब्दी सोहळ्यात मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ‘एडवर्ड स्मारक’ हा उल्लेख वगळण्याची सूचना केली. “हे नाव ब्रिटिश गुलामगिरीचे प्रतीक आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झाल्यानंतरही इंग्रजांच्या पाऊलखुणा कायम आहेत. मुंबई महापालिकेने गांभीर्याने याचा विचार करावा लोढा यांनी म्हटल्या नंतर नवीन. वादाला तोंड फुटले आहे. रुग्णालयात मूलभूत सुविधांची हेळसांड होत असतांना नाव बदलण्यापेक्षा रुग्णसेवा सुधारण्याची गरज असल्याचे मागणी जोर धरतं आहे.
कॅबिनेट मंत्री आणि मुंबई नगरीचे सह पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केलेल्या सूचनेनंतर रुग्ण, डॉक्टर आणि सामान्य मुंबईकर संतापाच्या भावना पाहायला मिळाल्या. केईएममध्ये आजही औषधांची तीव्र कमतरता, उपकरणे खराब, रुग्णांना बेड संख्या कमी असल्यामुळे रुग्णाला फरशीवर देखील झोपण्याची वेळ आल्याच समोर आले होतें. मूलभूत सुविधांची हेळसांड होत आहे.
लोढाजी, “हे” बदलून दाखवाच!
मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभातजी लोढा यांच्या ‘KEM हॉस्पिटलचे नाव बदला’ या वक्तव्यावर KEM चा एक माजी विद्यार्थी म्हणून व्यक्त केलेली माझी प्रतिक्रिया… संपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.https://t.co/dXqbfK4txI#KEMHospital… pic.twitter.com/W7e5SrBIn4
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) January 23, 2026
लोढा यांनी कार्यक्रमात AI-आधारित कम्युनिकेशन सेंटर, आरोग्य सुविधा केंद्र, मार्गदर्शन केंद्र, एनएसएस/एनसीसीद्वारे मदत, डॉक्टरांसाठी क्रीडा स्पर्धा, शताब्दी स्मरणिका आणि कोविड योगदानाचे दस्तऐवजीकरण अशा सूचना केल्या. पण हे सगळे फक्त कागदोपत्री राहिले तर काय फायदा? शताब्दी सोहळ्यात रुग्णालयाच्या वास्तविक समस्यांवर बोलण्याऐवजी नाव बदलण्यावर भर देणे हे सरकारचे प्राधान्य काय दाखवते? असा सवाल उपस्थितीत होत आहे.
४०० कोटी रोख रक्कम घेऊन जाणारे २ कंटेनर लुटल्याचा आरोप; तरुणाचे अपहरण, मारहाण प्रकरणामुळे राज्यात खळबळ
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी लोढा यांच्या भूमिकेवर जोरदार टिका केली “नाव बदलल्याने संस्थेच्या कार्यपद्धतीत बदल होत नाही. औषधांची कमतरता, आवश्यक यंत्रसामग्री व उपकरणांची गरज किंवा रुग्णालयाच्या सर्वांगीण विकासाबाबत बोलणे अपेक्षित होते. मात्र, यांचा व्यवसाय केवळ धर्माच्या मुद्द्यांपुरताच मर्यादित आहे. अशी भूमिका देशाला मागे घेऊन जाणारी आहे.अहमदाबादचे नाव आधी बदला असा सल्ला देखील सावंत यांनी लोढा यांना दिला आहे.
केईएमचे माजी विद्यार्थी आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही तर व्हिडिओ जारी करून सवाल उपस्थित केला आहे , भावना आणि वस्तुस्थिती प्राधान्य कशाला हवे? लोढाजी, स्वतःचे प्रोजेक्ट्स Lodha Bellagio, Lodha Bellissimo, Lodha Trump Tower अशी इंग्रजी/पाश्चात्य नावे का ठेवता? स्वतःचा प्रकल्प राम कुटीर किंवा शिवाजी हॉस्पिटल म्हणून का नाही बांधता? तसेच मुख्यमंत्री फडणवीस यानी नागापूर मध्ये, राष्ट्रीय स्वयं संघाने नाशिक मध्ये जे रुग्णालय उभे केले त्याचा आदर्श आपण घ्यावा असा सल्ला कोल्हे यांनी लोढा यांना दिला आहे.सोशल मीडियावरही देखील मोठ्या प्रमाणात प्रकारच्या KEM चे नाव बदलायचे तर Lodha Baskariyo करा पाहायला मिळत आहे
केईएम हे मुंबईचे हृदय असून पहिले हार्ट ट्रान्सप्लांट, पहिले टेस्ट ट्यूब बेबी झाले आहे . पण आज रुग्ण हेलपाटे खातात, औषधांसाठी धावपळ करतात. सरकारला प्रश्न आहे. नाव बदलण्या पेक्षा रुग्णालयात औषधे, व्हेंटिलेटर, स्टाफ आणि सुविधा का नाहीत? शताब्दी वर्षात ‘डे-कॉलोनायझेशन’ चे नाटक करण्यापेक्षा रुग्णसेवेचे ‘रे-कॉलोनायझेशन’ करा. राजकारणासाठी हा नाव बदनाचा राजकीय ड्रामा तर नाही ना याविषयी चर्चा राहू लागले आहे. मुंबई महापालिका आणि सरकारने नाव बदल करण्यापेक्षा रुग्णालय सुसज्ज करावीत अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे.
