बारामती जिंकताच सुप्रिया सुळेंचं पुणे शहरात जंगी स्वागत; अजितदादांबद्दल म्हणाल्या, मी…
Supriya Sule in Pune : बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी सलग चौथ्यांदा बाजी मारली. या निवडणुकीत त्यांनी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. या निवडणुकीत सुप्रिया सुळेंना 1 लाख 58 हजार 333 मताधिक्य मिळालं. या विजयानंतर आज सुळे पुणे शहरात आल्या होत्या. यावेळी कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत त्यांचं जंगी स्वागत केले. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बारामतीमधील विजयानंतर अजित पवारांना काय सांगणार असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर मी एक सुसंस्कृत मराठी मुलगी आहे. आपल्यापेक्षा वयाने, कर्तुत्वाने आणि नात्याने जे मोठे असतात त्यांनी काही मार्गदर्शन करायचं नसतं. उलट त्यांच्याकडूनच मार्गदर्शन घ्यायचं असतं असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
Loksabha Election Result : भाजप न हारले न जिंकले; 400 पारची गणितं कुठे आणि कशी चुकली?
इंडिया आघाडीच्या सर्व सहकारी, कार्यकर्ते, पदाधिकारी या सगळ्यांचा हा विजय आहे. गेले वर्ष संघर्षाचं होतं. बेरोजगारी, दुष्काळ, शेतीचे मोठे नुकसान या काळात झाले. अशा परस्थितीत ही निवडणुक होती. या निवडणुकीत दडपशाहीला मतदारांनी नाकारले, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. आता जबाबदारी खूप वाढली आहे. उद्यापासून राज्यात दुष्काळी दौरा सुरू करणार आहोत. चारा छावणी, पाणी, दुष्काळ निवारणासाठी कार्यकर्त्यांनी आता काम करावे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
आमच्या इंडिया आघाडीकडे मॅजिक नंबर आमच्याकडे नाही. त्यामुळे सध्या वेट अँड वॉचची भूमिक घेतली आहे. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक राज्यातील परिस्थिती पाहून सध्या आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
बारामतीत मतदानाचा टक्का चंद्रकांतदादांमुळे कमी झाला; दोन दादांमधील वाद पुन्हा वाढणार?