अजितदादांच्या बैठकीला चार आमदारांची दांडी, अस्वस्थ आमदार शरद पवार गटात जाणार?
Ajit Pawar NCP Meeting : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha elections) राज्यात महायुतीला मोठा फटका बसला. राष्ट्रवादीत बंडाळी करून बाहेर पडलेल्या अजित पवार (Ajit Pawar) गटाला 4 पैकी केवळ 1 जागा जिंकता आली आहे. त्यामुळं अजित पवार गटाचे आमदार धास्तावले असून ते शरद पवार गटात गटात परतणार असल्याची चर्चा सुरू झाली. अशातच आता चार आमदारांनी अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या बैठकीला दांडी मारल्याचं वृत्त आहे.
राहुल गांधींचा मोदींवर गंभीर आरोप, केली JPC चौकशीची मागणी, म्हणाले, खोटे एक्झिट पोल्स दाखवून…
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार यांच्या पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसची आज आढावा बैठक झाली. या बैठकीला 4 आमदार अनुपस्थित राहिले. या बैठकीला धर्मरावबाबा आत्राम, सुनील टिंगरे, अण्णा बनसोडे, राजेंद्र शिंगणे हे आमदार गैरहजर होते. विशेष म्हणजे, अण्णा बनसोडे हे अजित पवारांचे कट्टर समर्थक मानले जातात. मात्र, त्यांनीही बैठकीला दांडी मारल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या.
दरम्यान, या आमदारांनी ते या बैठकीला का अनुपस्थित होते याची कारणं पक्षाकडे दिली असल्याची माहिती आहे. धर्मरावबाबा आत्राम आणि राजेंद्र शिंगणे हे आजारी असल्याचे सांगण्यात येत आहे. तर सुनील टिंगरे बाहेर असल्याचं सांगण्यात येत आहे.
तर अण्णा बनसोडेंनी सांगितलं की, वैयक्तिक कारणामुळे मी बैठकीला गेलो नाही. यासंदर्भात मी त्यांना माहिती दिली आहे. जेव्हा जेव्हा उठाव झाला, तेव्हा तेव्हा मी अजितदादांच्या सोबत होतो आणि उद्याही अजितदादांच्या सोबत राहणार असल्याचं ते म्हणाले.
आमदारांमध्ये धास्ती का?
भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीचा पाठिंबा असूनही अजित पवार बारामती लोकसभा मतदारसंघ जिंकू शकले नाहीत. 39 आमदारांचा पाठिंबा असूनही आणि राज्य सरकारमध्ये असूनही त्यांच्या गटाला केवळ रायगडची जागा जिंकता आली. राजकीय वारं अजितदादांच्या विरोधात आहे आणि आपला विधानसभेला निभाव लागणार नाही, असं वाटत असल्यानं आमदार धास्तावले.