टगे आणि खाटकांच्या तावडीत महाराष्ट्राची कारखानदारी; सदाभाऊ खोतांचा दोन्ही पवारांवर घणाघात

टगे आणि खाटकांच्या तावडीत महाराष्ट्राची कारखानदारी; सदाभाऊ खोतांचा दोन्ही पवारांवर घणाघात

Sadabhau Khot News : रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी आज राज्याचे साखर आयुक्त यांची भेट घेतली. यावेळी दोन साखर कारखान्यांतील हवाई अंतराची मर्यादा काढून टाकावी, अशी मागणी केली तर दोन साखर कारखान्यांतील हवाई अंतर जे 25 किलोमीटर आहे ते शून्य करण्यात यावी अशीही मागणी खोत यांनी केली. शिवाय ज्यांना साखर कारखाने काढायचे त्यांना परवानगी द्यावी, असं देखील ते म्हणाले. याचबरोबर कारखानदारीवरून काका-पुतणे शरद पवारांसह (Sharad Pawar) अजित पवारांवर (Ajit Pawar) देखील त्यांनी हल्लाबोल केला आहे.

अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळा; काँग्रेस नेत्यांच्या सहभागी होण्यावर राहुल गांधी पहिल्यांदाच बोलले…

आज महाराष्ट्रामध्ये 110 खाजगी साखर कारखाने असून 100 साखर कारखाने सहकारी आहेत. म्हणजे खाजगी साखर कारखान्यांची संख्या ही सहकारी साखर कारखान्यांपेक्षा जास्त झाली आहे. हे खाजगी सहकारी साखर कारखाने केवळ 15 ते 20 लोकांच्या हातात असल्याने या 20 लोकांनाच पोसण्याचे काम करण्यासाठी महाराष्ट्रातला ऊस उत्पादक शेतकरी ऊस लावत नाही तर त्यांनी लावलेला ऊस शेतात चढू द्यायचे की त्याची दारू बनवायचा याचा अधिकार त्या शेतकऱ्याला द्यावा, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

राज्यभरात एकट्या पवार कुटुंबाचे 50 पेक्षा जास्त साखर कारखाने आहेत. एकदा पवार कुटुंबाचं गाळद दीड लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त आहे. असे हे सगळे टगे साखर कारखानदारीमध्ये आले आहेत. या टग्यांना असं वाटतं जसं खाटकाच्या तावडीतून बकरी सुटली बकरीला आनंद होतो मात्र खाटकाला आनंद होत नाही. त्यामुळे या कारखानदार खाटकांच्या तावडीतून महाराष्ट्रातला शेतकरी मुक्त झाला पाहिजे. पण सरकारमध्ये नेहमीच खाटकांचे वर्चस्व जास्त राहील आहे, असा टोलाही खोतांनी दोन्ही पवारांना लगावला.

आमदारकी वाचवली, CM पद सेफ केले… तरीही शिंदेंनी नार्वेकरांना कोर्टात खेचले, नेमके कारण काय?

दरम्यान, पुढे बोलताना ते म्हणाले, लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना महायुतीमध्ये जागा वाटपावरून घमासान सुरू आहे. अशातच आता महायुतीचा घटक पक्ष असणाऱ्या रयत क्रांतीने हातकणंगलेची जागा मागितली आहे. या जागेवर शिवसेनेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांचा दावा कायम असल्याने महायुतीमध्ये आता या जागेवरून संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. तर माने यांनी ही जागा रयत क्रांती संघटनेला द्यावी, अशी मागणीही खोत यांनी केली.

दुसरीकडे हातकणंगले या जागेवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांनी आपण निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे कधीकाळी शेट्टी यांचे कट्टर मित्र असणारे सदाभाऊंनी देखील दंड थोपटले असून हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे राज्यात आता पुन्हा एकदा शेट्टी विरुद्ध खोत असा संघर्ष पाहायला मिळू शकतो. आता सदाभाऊंची मागणी भाजप आणि महायुतीकडून मान्य केली जाते का? आणि शेट्टी आणि खोत यांच्यात लढत होती का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube