‘आमचा फक्त वाजंत्री म्हणून वापर करणार का?’, सदाभाऊ खोतांनी डागली भाजपवर तोफ
Sadabhau Khot : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर सगळ्याच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महायुतीच्यावतीने (Mahayuti) आज राज्यभरात घटक पक्षासोबत मेळावे घेण्यात आले. सांगली जिल्ह्यात आज मेळावा झाला. या मेळाव्यात बोलतांना रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी आपली खदखद व्यक्त केली. सत्तेत आल्यानंतर घटक पक्षांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना आता घटक पक्षांची आठवण झाली आहे. निवडणुकीत आमचा वाजंत्री म्हणून वापर करणार आहात का? असा सवाल त्यांनी केला.
भाजप कार्यकर्त्यांना अजितदादांच्या भाषणाची आस… पण रामराजेंनी बॅटिंग केली..
रविवारी सांगलीत महायुतीत सहभागी 16 घटक पक्षांचा मेऴावा झाला. भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व माजी मंत्री आमदार विनय कोरे यांच्या उपस्थितीत हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना खोत यांनी भाजपवर तोफ डागली. ते म्हणाले, वारा विरुद्ध गावगाडा अशी आमची लढाई आहे. आमची लढाई प्रस्थापित विरुद्ध विस्थापित लढाई आहे. विस्थापिताची बाजू घेणाऱ्या माणसांना तुम्ही बोलालं. हे आमचं भाग्य. शेवटच्या काळात का होईना, आमची आठवण आली. आता निवडणुक जवळ आली त्यामुळं आता आमची तुम्हाला आठवण तरी आली. आम्हीही आलो. आमच्याही लक्षात आलं, पीक उगवून आलंय. आता निंदण करायचं. तण काढायला आलो, पण काढमार उपाशी राहता कामा नये, हे लक्षात ठेवा. घटकपक्ष आज पहिल्यांदा बोवलले गेले, असं खोत म्हणाले.
‘कारसेवक लाठ्या खात होते, तेव्हा तुम्ही वाघाचे फोटो काढत होता’; फडणवीसांची ठाकरेंवर बोचरी टीका
ते म्हणआले, तीन चार पक्षांच्या अध्यक्षांना कधी बोलावलं असतं, जरा निधी दिला असता, तर तेही जोमाने कामाला लागले असेत. घटक पक्ष म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलो. मात्र गेल्या दीड वर्षात आम्हाला घटक पक्ष म्हणून सन्मान मिळाला नाही, नियोजन मंडळाकडून पाच लाखांचा निधी मिळू शकला नाही, असं खोत म्हणाले.
ते म्हणाले, आम्हाला काहीही द्या, नका देऊ. पण आम्ही तुमच्या सोबत आहोत. कारण, देशात रामराज्य येणार आहे. मोदी ते आणणार आहेत. मुंबईच्या बैठकीला मी गेलो होता. नेते म्हणाले, आता कामाला लागा, योजना लोकांपर्यंत पोहोचवा. मी म्हणालो तुम्ही काय आम्हाला बॅंडवाले समजता का? लग्न आलंय, म्हणून ताशे-पिपण्या, ढोला पाहायला लागलाय. आम्हाला फक्त वाजवायला बोलावताय का? असा सवालही खोत यांनी केला.
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करू
आम्ही लढणारे, लाठ्या खाणारे आहोत. मी पाच लाख मतं घेतलेले आहेत. त्यामुळं लहान लहान पक्षांच्या कार्यकर्त्यांना सन्मान द्या. घटक पक्षांमध्ये मतभेद असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करू, महाआघाडीचा घटक पक्ष म्हणून आपण आपली जबाबदारी निश्चितपणे पार पाडू, असा विश्वास खोत यांनी व्यक्त केला.