भाजप कार्यकर्त्यांना अजितदादांच्या भाषणाची आस… पण रामराजेंनी बॅटिंग केली..

  • Written By: Published:
भाजप कार्यकर्त्यांना अजितदादांच्या भाषणाची आस… पण रामराजेंनी बॅटिंग केली..
पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घटक भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं (आठवले गट) आणि मित्र पक्षांच्या महायुतीचे संकल्प मेळावे आज जिल्हानिहाय राज्यभर झाले. पुण्यातील मेळाव्याकडे अनेकांचे लक्ष होते. कारण उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे या मेळाव्याला मार्गदर्शन करणार होते. पहिल्यांदाच अजितदादांचे भाषण थेटपणे ऐकायला भाजपचे कार्यकर्ते पुण्याती डीपी रस्त्यावरील शुभारंभ लॉन येथे जमले होते. पण त्यांचा भ्रमनिरास झाला.

अजित पवार यांच्याऐवजी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर (Ramraje Nimbalkar) यांनी या वेळी मार्गदर्शन केले. माजी क्रिकेटपटू असलेल्या रामराजे यांनीही मग जोरदार बॅटिंग केली. अजितदादा हे त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे आले नसल्याचे रामराजेंनी आधी स्पष्ट केले. पण आपण पुणेकरच असल्याचे आवर्जून सांगितले.

रामराजे यांनी थेट शरद पवारांविषयी भाष्य केले नाही पण मोदींचे आकर्षण असल्याच आवर्जून सांगितले.
निंबाळकर म्हणाले, “माझे कार्यस्थळ सातारा असले तरी जन्मस्थळ व शिक्षण स्थळ पुणे आहे. मोदीच्या कार्यशैलीमुळे आपण एकत्र आलो आहोत. 72 साली दुष्काळात मिलो खाणारा देश आता पाच ट्रीलियन डॉलरची अर्थव्यवस्था होत आहे. हे दुसऱ्या पक्षातून भाजपसोबत आलेल्यांनाना आकर्षण आहे. राजकीय विचारधारा काही असली तरी मोदींची विकासाची विचारधारा हाच भारताचा धर्म होईल. त्यांची राजकीय इच्छाशक्ती आणि अपार कष्ट करायची ताकद इतर पक्षातील नेत्यांना भावत आहे.
महायुतीत येण्याचे भाग्य राष्ट्रवादीला मिळाले. उगाच काही न करणारे नेतृत्व आता नाही. एकमेकांविषयीची कटुता दूर करण्याची संधी या मेळाव्यात आली आहे.  पूर्वीच्या नेतृत्वाबद्दल काही बोलणार नाही, परंतु मोदिशिवाय पर्याय नाही. माझ्या नावातच राम आहे, परंतु इतके वर्ष वनवासात होतो. आता मोदींमुळे व्यवस्थित बाहेर आलो आहे. महायुती हाच आपला पक्ष झाला आहे ही भावना असली पाहिजे. सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम केल्यास आपला विजय नक्की आहे
दहा लाखांच्या फरकाने पुण्याची जागा जिंकू
माजी खासदार प्रकाश जावडेकर म्हणाले की तिसरी बार मोदी सरकार आणि इस बार चार सो पार हा संकल्प साकार करण्यासाठी राज्यात ४८ च्या ४८ जागा निवडून आणणार. बारामती २०१४ लाच पडत होते. थोडक्यात घोटाळा झाला. या वेळी तेथे आपल्याला यश मिळेल . उद्धव ठाकरे यांच्या रूपाने दोन वर्षे बसे मुख्यमंत्री राज्याने पाहिले आहेत. तेलंगणात असेच मुख्यमंत्री होते. लोकांनी त्यांना घरी बसविले. काम करणारी सेना हवी आहे. राम प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमावर काँग्रेस बहिष्कार टाकत आहे. चांगल्या गोष्टीला  काँग्रेसला या देशाचे सत्व कळले नाही. या देशातील जनता तुमच्यावर बहिष्कार टाकणार आहे.
लोकसभा निवडणुकीला शंभर दिवस राहिले असून, सर्व पक्षांनी एकजीवाने काम केले पाहिजे. प्रत्येक घरी जाऊन आपले मत पोहोचवा. कामाचे वाटप नीट करून वेळापत्रक तयार करा. त्यासाठी पुण्यात पन्नास टक्के मतदान झाले होते. पुण्यात ७५ टक्के मतदान झाल्याशिवाय राहणार नाही. त्यातून दहा लाखाच्या फरकाने जिंकल्याशिवाय राहणार नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube