‘कारसेवक लाठ्या खात होते, तेव्हा तुम्ही वाघाचे फोटो काढत होता’; फडणवीसांची ठाकरेंवर बोचरी टीका
Devendra Fadnavis : येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात (Ram Temple in Ayodhya) प्रभू श्रीरामाच्या (Lord Shriram) मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. त्यामुळं देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. या कार्यक्रमासाठी मंदिर समितीने शेकडो साधू-संत, राजकारणी, कलाकारांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले आहे. तर दुसरीकडे राम मंदिराच्या मुद्द्यावरून राजकारणही तापतांना दिसतं. ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) राम मंदिरावरून भापजवर आणि फडणवीसांवर जोरदार टीका केली होती. त्या टीकेला आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) प्रत्युत्तर दिलं. तुम्ही वाघाचे फोटो काढत होता, तेव्हा कारसेवक अयोध्येत लाठ्या खात होते, असा घणाघात फडणवीसांनी केला.
काँग्रेस का सोडली? शिवसेनेत प्रवेश करताच मिलिंद देवरांची पत्रातून जाहीर भूमिका
ठाण्यातील आनंदनगर भागातील ठाणे महानगरपालिकेच्या मैदानावर राम कथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले आहेत. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी राम मंदिरावरून ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, ज्यांनी रामाला नाकारले त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलात. लाज वाटली पाहिजे. तुम्ही अयोध्येला येणार नाही, कारण रामललाशी तुम्ही नजरं मिळवू शकत नाहीत, अशी टीका फडणवीसांनी केली.
आधी मी कारसेवक – फडवीस
ते म्हणाले, मीही कारसेवक आहे हे मी गर्वाने सांगतो. पहिल्या कारसेवला मी वीसाव्या वर्षी गेला होता. तेव्हा बदायुच्या जेलमध्ये 18 दिवस होतो. ज्यावेळी दुसऱ्या कारसेवेला कलंकित ढाचा पाडला, तेव्हाही मी तिथचं होतो. अटलजींच्या काळात तिसरी कारसेवा झाली, तेव्हाही मी कारसेवेला गेलो होता. मला गर्व आहे की एक कारसेवक आहे. रामसेवक आहे. उपमुख्यमंत्री ही माझी दुसरी ओळख आहे, आधी मी कारसेवक आहे, असं फडणवीस म्हणाले.
तुमचे अश्रू पुसण्यासाठी का आले नाहीत; पहिल्याच दिवशी राहुल गांधी मोदींवर बरसले!
त्यावेळी तुम्ही वाघाचे फोटो काढले
फडणवीस म्हणाले, काल त्यांनी विचारले की फडणवीस कारसेवक होते का? होय, मी त्यावेळी वीस वर्षांचा होतो, त्यावेळी कारसेवक होता. उद्धवजी तुमचं तर वय होतं, पण त्यावेळी तुम्ही कुठल्यातरी जंगलात वाघाचे फोटो काढत होते. खरे कारसेवक तर अयोध्येत लाठ्या खात होते. बंदुकीच्या गोळ्या खात होते. त्यावेळी तुम्ही फोटो काढत होता. तुम्ही आम्हाला काय सांगणार कारसेवा, असा म्हणत फडणवीसांनी हल्लाबोल केला.
ठाकरे गटात कोणीही वाघ नाही
फडणवीस म्हणाले, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे वाघ होते. पण, ठाकरे गटात कोणीही वाघ नाही. एक नेता दाखवा ज्याने राममंदिरासाठी काम केलं. ढाचा पाडतांना उपस्थित असलेला एक नेता मला दाखवा. आमच्याकडे अनेक नेते होते. लालकृष्ण अडवाणी होते, मुरली मनोहर जोशी होते. आमचे सगळे नेते कारसेवक होते, असं म्हणत फडणवीसानी टीका केली.
22 जानेवारीला पंतप्रधान मोदींच्या हस्ते भव्य राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होतेय, याचा मला आनंद आहे. पण, काही लोकांनी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमावर बहिष्कार टाकला, असं म्हणत फडणवीसांनी कॉंग्रेसवरही निशाणा साधला.