आमदारकी वाचवली, CM पद सेफ केले… तरीही शिंदेंनी नार्वेकरांना कोर्टात खेचले, नेमके कारण काय?
Disqualification Mla : शिवसेनेच्या अपात्र आमदार प्रकरणावर (Disqualification Mla) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) निकाल दिल्यानंतर आता ठाकरे गटाकडून जोरदार पाऊलं उचलली जात आहेत. एकनाथ शिंदे यांचा गटाची शिवसेना (Shivsena) खरी आहे. तर शिंदे आणि ठाकरे गटाच्या दोन्ही आमदारही पात्र आहेत. असा निर्णय नार्वेकरांनी दिला. या निकालाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
हंसराज अहिर यांनी जुनी जखम उघडी केली… टेन्शन सुधीर मुनगंटिवारांना!
तर दुसरीकडे नार्वेकरांनी एकनाथ शिंदे यांचे सीएम पद सेफ केलं, आमदारकीही वाचवली, तरीही शिंदे गटाकडून नार्वेकरांना कोर्टात खेचण्यात आले आहे. याचं कारण म्हणजे नार्वेकर यांनी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आमदारांनाही पात्र ठरवलं आहे. याच निर्णयाविरोधात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना एकीकडे ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात तर शिंदे गटाने उच्च न्यायालयात खेचलं आहे.
नार्वेकरांनी काय निकाल दिला?
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानूसार 10 जानेवारीला निकाल जाहीर केला. नार्वेकरांनी निकालामध्ये शिवसेना पक्षाच्या घटनेतील 2018 मध्ये करण्यात आलेले बदल मान्य केले नसून एकनाथ शिंदेंचीच शिवसेना खरी असल्याचं सांगितलं. तर व्हिप म्हणून भरत गोगावलेंची नियुक्ती वैध ठरवली आहे. तसेच दोन्ही गटाचे आमदार पात्र ठरवले आहेत.
CM Shinde यांच्या दावोस दौऱ्यात महाराष्ट्रात येणार, तीन लाख दहा हजार कोटी गुंतवणूक
दरम्यान, नार्वेकरांच्या निकालावर आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करण्यात आल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. निकालानंतर आज ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात नार्वेकरांच्या निकालाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. आता या याचिकेवर न्यायालयात सुनावणीदरम्यान, कोणत्या बाबी समोर येणार हे पुढील काळातच समजेल…